Tata Curvv EV : टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV भारतात लाँच केली आहे. टाटाची ही एसयूव्ही कार सिग्नेचर व्हर्च्युअल सनराइज पेंट स्कीममध्ये डिझाइन केलेली पहिली बजेट कूप एसयूव्ही असणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत १७.४९ लाखांपासून सुरू होत असून ती २१.९९ लाखांपर्यंत असेल. विशेष बाब म्हणजे ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहक तुटून पडले आहेत. बुकिंग सुरू होताच त्याचा प्रतीक्षा कालावधी आठ आठवडे (५६ दिवसांवर) पोहोचला आहे. कंपनीने सांगितले की, कर्व्हच्या 45kWh व्हेरिएंटसाठी वेटिंग पीरियड आठ आठवडे आहे आणि 55kWh व्हेरिएंटसाठी सहा आठवडे वेटिंग पीरियड आहे. मात्र, ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे त्यांना या महिन्याच्या अखेरीस कारची डिलिव्हरी मिळू शकते.

शानदार फीचर्सनी सज्ज

१८ इंच व्हिल्सव्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये १९० मिमी ग्राउंड क्लीयरन्स, ४५० मिमी वॉटर वेडिंग क्षमता, फ्लश डोअर हँडल, ५०० लिटर बूट स्पेस, कनेक्ट केलेले ॲप्स, एलईडी लाइट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स, ॲम्बियंट लाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर टेलगेट आहे. स्टार्टर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

बॅटरी पर्याय

टाटा कर्व्ह ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध असेल. कर्व्ह ईव्ही ४५ साठी ४५ किलोवॅट बॅटरी आणि कर्व्ह ईव्ही ५५ व्हर्जनसाठी ५५ किलोवॅट बॅटरी असेल. यात १६५ बीएचपीची इलेक्ट्रिक मोटर असेल.

हेही वाचा >> नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर थांबा; टीव्हीएस २२ ऑगस्टला करणार मोठा धमाका, नवीन स्कूटरचा टीझर रिलीज

टाटा कर्व ईव्ही एकूण ५ मोनोटोन शेड्समध्ये लाँच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा कर्व्ह ईव्ही एकूण पाच मोनोटोन शेड्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये प्रिस्टाइन व्हाइट, फ्लेम रेड, एम्पॉर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि व्हर्च्युअल सनराइज यांचा समावेश आहे. यापैकी तीन शेड्स Nexon EV मधून घेतल्या आहेत, प्योर ग्रे कर्व्ह EV साठी अपडेटेड आहे. Curvv EV सह कोणतेही ड्युअल-टोन फिनिश ऑफर केलेले नाही. हे 5 ट्रिम लेव्हलमध्ये प्योर, क्रिएटिव, एक्म्पलिश्ड आणि एम्पावर्ड लाँच केले गेले आहे.