टाटा मोटर्सच्या ताफ्यात आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही सहभागी झाली आहे. टाटा मोटर्सने कूप-स्टाईल बॉडीसह Tata Curvv इलेक्ट्रिक एसयूव्ही संकल्पना सादर केली आहे. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एसयूव्हीची रचना अतिशय आकर्षक असून स्मार्ट तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह आहे. या गाडीच्या माध्यमातून भविष्यातील दृष्टीकोन अधोरेखित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलीझ केलेल्या टीझरवरून समोरील बाजूस LED डेटाइम रनिंग लॅम्प्स (DRLs) दिले आहेत. जे बोनेट क्रीजच्या रुंदीमध्ये, बाजूने आणि ORVM मध्ये बसवले आहेत. हेडलाइट युनिट त्रिकोणाच्या आकाराच्या आवरणात ठेवलेले आहे. ग्रे मशीन-कट अलॉय व्हील्स देखील दिसू शकतात, तर कूप बॉडी डिझाइन हे हायलाइट आहे. वाहनाच्या मागील बाजूस टाटा आणि इव्ही लोगो लावलेले आहेत. . मागचे दरवाजे लांब असतील, छत निमुळते होईल आणि संपूर्ण मागचे टोक लांब ओव्हरहॅंगसह पुन्हा डिझाइन केले जाईल. व्हीलबेस सुमारे ५० मिलीमीटरने वाढण्याची अपेक्षा आहे. ते सुमारे ४.३ मीटर लांब असण्याचा अंदाज आहे.

टाटा मोटर्सच्या मते, कर्व पहिल्यांदा इलेक्ट्रिक वर्जन येईल, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय मिळतील. टाटा कर्व कूप रूफलाइनसह डिझाइन केलेले आहे आणि ऑटो एक्स्पो २०२० मध्ये प्रदर्शित केलेल्या Tata Sierra EV संकल्पनेवर आधारित आहे. या गाडीची एका चार्जवर रेंज ५०० किमी इतकी असू शकते. त्यातील बॅटरी जलद आणि कमी पॉवरमध्ये चार्ज होऊ शकते. ही कार एसी आणि डीसी दोन्ही चार्जिंग पॉईंटवरून चार्ज केली जाऊ शकते. उत्पादन मॉडेल नुकत्याच लाँच केलेल्या MG ZS इलेक्ट्रिक आणि आगामी Hyundai Kona Electric आणि Kia Niro Electric ला टक्कर देईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors introduce concept curvv electric suv rmt
First published on: 06-04-2022 at 13:50 IST