टाटा मोटर्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. नुकतेच टाटाने एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली Nexon हे मॉडेल लॉन्च केले होते. तसेच टाटा ईव्ही सेगमेंटमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. आता टाटा मोटर्स लवकरच नेक्सॉन फेसलिफ्ट लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्हीबद्दल माहिती मिळण्यास सुरूवात झाली आहे. Nexon फेसलिफ्टबद्दल जाणून घेऊयात.

नेक्सॉन फेसलिफ्ट : इंजिन आणि गिअरबॉक्स

नेक्सॉन फेसलिफ्ट मॉडेल सध्याच्या नेक्सॉनमध्ये असणाऱ्या १.२ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आणि १.५ लिटरचे डिझेल इंजिनद्वारे समर्थित असणार आहे. तसेच हे ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड AMT शी जोडलेले असेल. मात्र आता नवीन फेसलिफ्टमधेय पेट्रोल इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. त्यन्मुले नेक्सॉन फेसलिफ्ट १.२ पेट्रोल चार गिअरबॉक्ससह पर्यायांसह उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.

हेही वाचा : भारतात Realme 11 5G लॉन्च, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…., किंमत २० हजारांपेक्षा कमी

५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स एंट्री लेव्हल ट्रीम्सवर उपलब्ध असेल. तर ७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हाय स्पेक ट्रीम्ससाठी आरक्षित असेल. मिड आणि हाय स्पेक पेट्रोल ट्रीम्समध्ये ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. अत्याधुनिक ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा अभाव ही आउटगोइंग नेक्सॉनची एक मोठी समस्या होती. विशेषतः जेव्हा ब्रेझा, वेन्यू, सोनेट, किगर आणि मॅग्नाइट सारखे प्रतिस्पर्धी सर्व टॉर्क कन्व्हर्टर, CVT किंवा ड्युअल-क्लच ऑटो ऑफर करतात.

एक्सटेरिअर आणि इंटेरिअर

नेक्सॉन फेसलिफ्टला आत आणि बाहेरील बाजूस नवीन अपडेट मिळणार आहे. बाहेरील बाजूस टाटाने महत्वपूर्ण बदल केले आहेत. ज्यामध्ये शीट मेटल बदल देखील करण्यात येणार आहे. तसेच नेक्सॉन फेसलिफ्टने टाटा कर्व्हपासून डिझाइनची प्रेरणा घेतल्यासारखे दिसते. मुख्य डिटेल्समध्ये नवीन स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, मागील बाजूस LED टेललाइट, नवीन ड्युअल-टोन अलॉय असे डिझाइन मिळू शकते.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. नेक्सॉन फेसलिफ्ट मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, रेनॉल्ट किगर, निसान मॅग्नाइट, किआ सोनेट आणि महिंद्रा XUV300 सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींना टक्कर देईल. यातील शेवटच्या दोन मॉडेल्समध्ये देखील अपडेट मिळणार आहे. यामध्ये मिळणाऱ्या अपडेटमुळे किंमतीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. याची किंमत सध्या ८ लाख ते १४.६० लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.