Best Selling Car: भारतीय कार बाजारात, SUV कार विक्रीच्या बाबतीत हळूहळू हॅचबॅक कारला मागे टाकत चालली आहेत. Hyundai Creta ची मागणी काही काळापासून झपाट्याने वाढली आहे आणि जून महिन्यातही ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV होती. याशिवाय मारुती ब्रेझाच्या विक्रीतही लक्षणीय वाढ होत आहे. पण २०२३ च्या पहिल्या ६ महिन्यांतील विक्रीचे आकडे बघितले तर परवडणाऱ्या SUV ने इतर सर्वाना मागे टाकत बेस्ट सेलिंगचा किताब पटकावला आहे.
Tata Nexon ही वर्ष २०२३ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. या ६ महिन्यांत या SUV च्या ८७,५०१ युनिट्सची विक्री झाली आहे. तर एक वर्षापूर्वी म्हणजेच २०२२ च्या पहिल्या सहामाहीत नेक्सॉनच्या ८२,७७० युनिट्सची विक्री झाली होती. अशाप्रकारे नेक्सॉनच्या विक्रीत ५.७२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्यानंतर नेक्सॉन दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई क्रेटा आणि तिसऱ्या क्रमांकावर मारुती ब्रेझा आहे. या दोन्ही कारच्या अनुक्रमे ८२,५६६ युनिट्स आणि ८२,१८५ युनिट्सची विक्री झाली आहे.
(हे ही वाचा : भारतीयांच्या ‘या’ आवडत्या गाड्या इतिहासजमा होणार; यादीत Tata, Mahindra, Toyota च्या गाड्यांच्या समावेश )
टाटा नेक्सॉनला ग्राहकांची पसंती का?
Tata Nexon ही सबकॉम्पॅक्ट SUV आहे, ज्याच्या बेस मॉडेलची किंमत रु. ७.८० लाख आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत १४.३० लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. टाटा नेक्सॉनला ५ स्टार सेफ्टी रेटिंग असून ग्राहक यामुळे तिला पसंती देत आहेत.
सुरक्षेसाठी मानक वैशिष्ट्य म्हणून ड्युअल एअरबॅग उपलब्ध आहेत. यात इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, रोल-ओव्हर मिटिगेशन, इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्री-फिल आणि ब्रेक डिस्क वाइपिंग सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. यात EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, उंची अॅडजस्टेबल सीटबेल्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, एअर प्युरिफायर, ऑटो डिमिंग IRVM सह ABS मिळते.
टाटा नेक्सॉनमध्ये ग्राहकांना फिचर्स, इंजिन, डिझाइन, मायलेज आणि सुरक्षेसह अनेक चांगले फिचर्स मिळतात. तसंच नेक्सॉनच्या इंजिनमध्ये दोन व्हेरियंट पर्याय तेदेखील ग्राहकांना आवडत आहेत. कंपनी नेक्सॉनला एकूण ६५ व्हेरियंट्समध्ये विकत आहे.