Honda Scooter Sales Cross 3 Crore Units: भारतात दुचाकींची संख्या करोडोंच्या घरात आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचे ३० दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत. २००१ साली सादर केलेली ही स्कूटर आतापर्यंत २२ वर्षात ३ कोटींहून अधिक ग्राहकांनी खरेदी केली आहे.

Activa २००१ मध्ये लाँच

Honda ने आपली सर्वात प्रसिद्ध टू-व्हीलर विक्रीचा एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आज २७ जून रोजी जाहीर केले की, Activa, भारतातील नंबर १ स्कूटर ब्रँडने ३० दशलक्ष ग्राहक मिळवून भारतीय दुचाकींमध्ये आणखी एक इतिहास रचला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, कामगिरी आणि अतुलनीय विश्वासार्हता यांचे एकत्रीकरण, अ‍ॅक्टिव्हा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आवडते आणि बऱ्याच काळापासून सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. २००१ मध्ये सादर झाल्यानंतर, अवघ्या तीन वर्षांत, Activa स्कूटर सेगमेंटचा राजा बनला. पुढच्या दोन वर्षात दहा लाख ग्राहकांचा टप्पा पार केला. अ‍ॅक्टिव्हाने २०१५ सालापर्यंत १५ वर्षांत १० दशलक्ष वापरकर्त्यांचा आकडा गाठला. स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे अॅक्टिव्हा ही भारतीय कुटुंबांची पहिली पसंती बनली आहे.

(हे ही वाचा : ४.२ लाखाच्या कारसमोर सर्व पडल्या फिक्या, देशातच नव्हे तर परदेशातही उडवली खळबळ, होतेय धडाधड विक्री )

दर महिन्याला Activa ची बंपर विक्री

Honda Activa च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, २०१५ नंतर ७-८ वर्षात २ कोटींहून अधिक लोकांनी ही स्कूटर खरेदी केली आणि एकूण २२ वर्षात Activa च्या विक्रीचा आकडा ३ कोटींवर पोहोचला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda Activa ची किंमत

भारतात ११० cc Honda Activa 6G ची एक्स-शोरूम किंमत ७५,३४७ रुपये ते ८१,३४८ रुपये आहे. त्याच वेळी, Honda Activa 125 ची एक्स-शोरूम किंमत ७८,९२० रुपये ते ८८,०९३ रुपये आहे. या दोन्ही स्कूटर लूक आणि फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त आहेत.