Advantages of Day Time Running Lights in Vehicles: AHO (Automatic Headlamp On ) एक स्वतंत्र सुरक्षा वैशिष्ट्य आहे ज्याचा बीएस 4 उत्सर्जन नियमांशी कोणताही संबंध नाही. १ एप्रिल २०१७ पासून सरकारने भारतात ही गोष्ट अनिवार्य केली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवसा लाईट्स चालू ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे, परंतु आजही अनेकांना या नियमाचे खरे कारण माहीत नाही. त्यांच्यासाठी, कंपन्यांनी वेगवेगळ्या बीएस मानकांसह वाहनांमध्ये केलेला बदल आहे. त्यामुळे या बातमीत आम्ही तुम्हाला याचे नेमके कारण सांगणार आहोत.

‘या’ कारणामुळे वाहनांचे लाईट्स दिवसा सुरु असतात

AHO ला अनिवार्य केले गेले कारण ते कमी प्रकाश व खराब हवामान असताना अपघात होऊ नयेत. किंबहुना, देशातील रस्ते अपघातांची गंभीर समस्या लक्षात घेऊन वाहनांमध्ये हेडलाइट्स सक्तीचे ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. जेणेकरुन धूळ, पाऊस, दाट धुके, प्रचंड रहदारीच्या काळातही वाहनांची स्थिती कळू शकेल. जे अपघाताचे प्रमुख कारण आहे. दुसरीकडे, सर्वसाधारणपणे समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या चालकांवर पडला की, दोन्ही बाजूचे वाहनचालक सावध होऊन अपघाताची शक्यता कमी होते.

(हे ही वाचा : पाकिस्तानात कोणत्या कंपनीच्या कारची सर्वाधिक विक्री होते माहितेय कां? नाव बघून तुम्ही व्हाल थक्क!)

ऑटोमोबाईल कंपन्यांनी केले नियमांचे पालन

वाहनांमध्ये दिवसा लाईट्स लावण्याचा नियम १ एप्रिल २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या सर्व वाहनांमध्ये दिवसा चालणारे दिवे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत जनतेला जागरूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शासन आदेश काढून माहिती देण्यात आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या’ देशांमध्ये हा नियम लागू

हा नियम युरोपियन देशांमध्ये २००३ मध्येच लागू करण्यात आला आहे. या देशांमध्ये इटली, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, कोसोवो, लॅटव्हिया, लिथुआनिया, मॅसेडोनिया, मॉन्टेनेग्रो, पोलंड असे देश आहेत. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये हा नियम आधीच लागू आहे.