गाडी चालवण्याबाबत किंवा त्यासाठी लायन्सस मिळवण्याबाबत भारतात काही नियम बनवण्यात आले आहेत, या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वयाची १८ वर्ष पुर्ण झालेले तरुण, तरुणी ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी एक परीक्षा देणे बंधनकारक असते. या परीक्षेबाबत अनेक गैरसमज असलेले पाहायला मिळते. त्यामुळे ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांना याचे दडपण येऊ शकते. यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतात. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.
आणखी वाचा- Traffic Challan: नवा वाहतूक नियम वाचलात का? ‘ही’ चूक केलीत तर भरावा लागेल ४० हजारांचा दंड!
ड्रायविंग लायसन्सची परीक्षा देण्याआधी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
- ड्रायविंग टेस्ट देण्याआधी तुम्ही पूर्णपणे गाडी चालवणे शिकून घ्या. शक्य असेल तितका सराव करा, यामुळे टेस्टदरम्यान तुम्हाला याचा फायदा होईल.
- टेस्ट दरम्यान तुम्ही तीच कार वापरा ज्या कारमध्ये तुम्ही सराव केला आहे. यामुळे टेस्टदरम्यान तुमची चुक होण्याची शक्यता कमी होते, कारण तुम्ही त्यात खुप दिवसांपासून सराव केलेला असतो.
- टेस्टला जाण्यापूर्वी कारचे सगळे बेसिक फीचर्स व्यवस्थित काम करत आहेत का याची खात्री करा. जर कारची लाईट बंद असेल तर तुम्ही टेस्टमध्ये नापास होऊ शकता. त्यामुळे कारचे सर्व फीचर्स नीट तपासा.
- टेस्ट दरम्यान जी कार वापरणार आहात त्या कारचे साइड मिरर, रियर, फ्रंट मिरर व्यवस्थित आहेत का हे टेस्टला जाण्यापुर्वीच तपासा. कारण टेस्टदरम्यान तुम्ही आरशाचा कसा वापर करता हे देखील तपासले जाते.
- सर्व ट्रॅफिक नियम जाणून घ्या आणि ते लक्षात ठेवा, कारण टेस्ट दरम्यान ट्रॅफिक नियमांबाबत प्रश्न विचारले जातात. ड्रायविंग टेस्ट देण्यासाठी जाताना कारचे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवा.