देशात रस्ते अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रशासन प्रयत्न करत आहे. एअर बॅग्स आणि थ्री पॉईंट सीटबेल्टबाबत नियम आखण्यात आले आहेत. यामुळे रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण घटल्याचं समोर आलं आहे. आता लवकरच मधल्या आसनांसाठीही थ्री पॉईंट सीटबेल्ट अनिवार्य केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी भारत सरकार लवकरच वाहन उत्पादकांना कारच्या सर्व सीटवर थ्री पाईंट सीटबेल्ट प्रदान करणे अनिवार्य करणार आहे. याचा अर्थ मध्यभागी बसलेल्या व्यक्तीलाही सीटबेल्ट मिळेल, असं सांगण्यात येत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच हा आदेश जाहीर करेल, असं वृत्त मिंटने दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या, भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश कारमधील फक्त पुढच्या आणि मागच्या दोन जागांवर तीन-पॉइंट सीटबेल्ट असतो. त्यांना Y-आकाराचे सीटबेल्ट देखील म्हणतात. मागच्या सीटवरील मध्यभागी बसलेल्या व्यक्तीसाठी टू पॉईंट किंवा लॅप सीटबेल्ट असतो. विमानाच्या सीट बेल्टसारखा असतो. भारतातील ठराविक वाहनं सोडली तर वाहनात मागच्या मधल्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी थ्री पॉईंट सीटबेल्ट नाही. त्याऐवजी त्यांना फक्त लॅप बेल्ट मिळतो, जो अपघाताच्या बाबतीत फारसा परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे अपघातात प्रवाशाला मोठा धोका असतो. यासाठी रस्ते व वाहतूक मंत्रालयाने एका महिन्याच्या आत एक मसुदा अधिसूचना जारी करण्याच्या तयारीत आहे. ज्यात ऑटोमेकर्ससाठी मागील सीटसाठी थ्री पॉईंट सीटबेल्ट अनिवार्य असणार आहे. मात्र, हा नियम बनवण्यापूर्वी सरकार जनतेच्या सूचना आणि प्रतिक्रिया मागवणार आहे.

TVS Ntorq 125 vs Honda Grazia: स्टाइल, मायलेज आणि किंमत जाणून घ्या

भारतात उत्पादित होणाऱ्या प्रवासी कारच्या सुरक्षा रेटिंगमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे. या निर्णयामुळे कारमधील प्रवाशांची सुरक्षा वाढेल. तसेच अपघातात जखमी किंवा मृत्यूची शक्यता कमी होईल, अशी अपेक्षा आहे. थ्री-पॉईंट सीटबेल्ट हे टू-पॉईंट सीटबेल्टपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. कारण ते अपघाताच्यावेळी छाती, खांदे आणि ओटीपोटावर हलणाऱ्या शरीराची उर्जा समान रीतीने पसरते आणि परिणामी कमी दुखापत होते. स्वीडिश ऑटोमेकर व्हॉल्वोने ऑगस्ट १९५९ मध्ये थ्री-पॉइंट सीट बेल्टचा शोध लावला. तथापि, सार्वजनिक सुरक्षिततेच्या अधिक हितासाठी ऑटोमेकरने पेटंट इतर कार निर्मात्यांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, सर्व कार निर्मात्यांना सर्व कारमध्ये सहा एअरबॅग प्रदान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three poing sealbelt may be mandatory for rear middle seat rmt
First published on: 08-02-2022 at 16:30 IST