हिवाळ्यात लोकं शक्यतो दुचाकीऐवजी कारने जाण्यास पसंती देतात. वर्षाअखेरीस दीर्घ सुट्ट्याही सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक जण हिल स्टेशनवर जाण्याचा बेत आखतात. मात्र या प्लान दरम्यान जर गाडी मध्येच बंद पडली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कार मेकॅनिकही सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे कार उत्तम स्थितीत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे रस्त्यात कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी काही टीप्स फॉलो करणं गरजेचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅटरी – हिवाळ्यात कारच्या बॅटरीची विशेष काळजी घ्यावी लागते. जर बॅटरी तीन वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल, तर ती बदला किंवा मेकॅनिककडून तपासून घ्या. जर तुम्ही अधूनमधून कार चालवत असाल तर दररोज कार सुरू करण्याचा प्रयत्न करा. यामुळे बॅटरी डिस्चार्ज होणार नाही आणि जेव्हा कधी तुम्ही कार सुरू कराल तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही. जर बॅटरीच्या टर्मिनलवर पांढर्‍या-पिवळ्या पावडरसारखे काहीतरी गोळा होत असेल. तर कोमट पाण्याने आणि कडक ब्रशने स्वच्छ करा.

टायर्स– प्रत्येक ऋतूत टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात टायर्समधील हवेचा दाब योग्य असला पाहिजे कारण थंड वातावरणात आर्द्रतेमुळे रस्ते ओले राहतात आणि ओल्या रस्त्यावर घसरण्याची भीती वाढते. टायर खूप झिजले असतील तर ते बदलून घ्या.

Maruti Suzuki: तुमच्या कारमध्ये काही समस्या असेल तर लगेच संपर्क साधा; ‘या’ गाड्यांसाठी विशेष सर्व्हिस मोहीम

कार सर्व्हिसिंग – हिवाळ्यात सकाळी गाडी सुरू न झाल्यामुळे लोक नाराज होतात. सर्व्हिसिंग वेळेवर न केल्याने अशा वाहनांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्व्हिसिंग आवश्यक आहे कारण इंजिनमध्ये वापरलेले इंजिन तेल जास्त वापरानंतर घट्ट होते आणि हिवाळ्याच्या हंगामात ते गोठण्याची शक्यता असते.

फॉग लॅम्प लावा – हिवाळ्यात रस्त्यावर धुके असणे स्वाभाविक आहे. कधीकधी रस्त्यावर दृश्यमानता खूपच कमी असते. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी कारमध्ये फॉग लॅम्प असणे आवश्यक आहे. त्यामुळे हिवाळ्यात नेहमी फॉग लॅम्पचा वापर करावा.

More Stories onकारCar
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips and tricks how to take care of your car in winter rmt
First published on: 30-11-2021 at 17:36 IST