क्रूझर बाइक सेगमेंट हा टू व्हीलर सेक्टरचा एक प्रीमियम सेगमेंट आहे. या बाइक्सची तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते. पण नुसतं आवड असून बाइक विकत घेता येत नाही. कारण या सेगमेंटमधल्या बाइक्सच्या किमती इतर बाइक्सच्या तुलनेत जास्त आहेत. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टायलिश क्रूझर बाइक खरेदी करायची असेल, तर तुम्ही या क्रूझर सेगमेंटमधील सर्वात स्वस्त टॉप ३ बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Bajaj Avenger Street 160: बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 160 ही एक स्टायलिश आणि हलकी क्रूझर बाइक आहे. बाइक तिच्या स्टायलिश आणि आरामदायी डिझाइनसाठी पसंत केली जाते. बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 160 मध्ये सिंगल सिलेंडरसह १६० सीसी इंजिन आहे. हे इंजिन एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 बाईक ५०.७७ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 160 ची सुरुवातीची किंमत रु. १,०८,९०२ (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ऑनरोड रु.१,२९,२८३ रुपयांपर्यंत जाते.

Suzuki Intruder: सुझुकी इंट्रूडर ही एक प्रीमियम डिझाइन केलेली क्रूझर बाइक आहे. बाइक तिच्या स्टायलिश बॉडी आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने यामध्ये सिंगल सिलेंडर १५५ सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही क्रूझर बाईक ३८.५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. सुझुकी इंट्रूडरची सुरुवातीची किंमत रु. १,२७,९०० (एक्स-शोरूम) आहे जी रस्त्यावर येताना रु. १,५२,९६४ रुपयांपर्यंत जाते.

Tata Motors लाँच करणार चार इलेक्ट्रिक कार; चांगल्या मायलेजसह मिळणार हायटेक फिचर्स, जाणून घ्या

Royal Enfield Bullet 350: रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही तिच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाइक्सच्या यादीत येते. बाइक तिच्या स्टायलिश आणि मजबूत डिझाइनसाठी पसंत केली जाते. यात ३४६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन एअर कूल्ड फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. रॉयल एनफील्ड बुलेटची सुरुवातीची किंमत रु १,४५,१५३ (एक्स-शोरूम) आहे जी रस्त्यावर येताना रु. १,६५,९७४ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 3 low budget cruiser bike know about it rmt
First published on: 18-04-2022 at 17:17 IST