Car Sales FY 2023:  देशात SUV कार खूप लोकप्रिय होत असल्या तरी, अजूनही परवडणाऱ्या कारची जोरदार मागणी आहे. २०२३ हे आर्थिक वर्ष कार उत्पादकांसाठी चांगले आहे. भारतात एका वर्षात ३९ लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली. FY२०२३ मध्येही कार विक्रीतील मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम राहिले आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या ४ कार एकट्या मारुती सुझुकीच्या आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी या कारची यादी घेऊन आलो आहोत, पाहा कोणत्या आहेत या कार्स…

‘या’ मारुतीच्या कारचा बोलबाला

Maruti Suzuki WagonR

मारुती वॅगन आर ही गेल्या आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. एका वर्षात २.१२ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. Wagon R ची किंमत फक्त ५.५ लाख रुपयांपासून सुरू होते. वॅगनआर ही एप्रिल महिन्यातही देशात सर्वाधिक विकली जाणारी कार होती. त्याची 20 हजारांहून अधिक युनिट्स विकली गेली.

Maruti Suzuki Baleno

मारुती सुझुकी बलेनो ही आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार ठरली आहे. त्याची एकूण विक्री २.०२ लाख युनिट्स होती. बलेनोच्या विक्रीत वार्षिक ३७ टक्के वाढ झाली आहे. त्याची किंमत ६.६१ लाख रुपयांपासून सुरू होते.

(हे ही वाचा : मारुतीची जबरदस्त ऑफर! सर्वात स्वस्त कार मिळतेय ६० हजारात, १ लिटर पेट्रोलमध्ये धावणार २४ किमी )

Maruti Suzuki Alto

गेल्या आर्थिक वर्षात मारुती अल्टो ही देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. एका वर्षात १.७९ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. Alto K10 ची किंमत फक्त ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Maruti Suzuki Swift

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, मारुती सुझुकी स्विफ्ट ही चौथी सर्वाधिक विक्री होणारी कार होती. संपूर्ण वर्षात १,७६,९०२ युनिट्सची विक्री झाली. स्विफ्टच्या विक्रीत ५.४० टक्के वाढ झाली आहे. स्विफ्टची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.