टोयोटा किर्लोस्कर मोटार भारतीय बाजारात नव नव्या कार लाँच करत असते. भन्नाट फीचर्स आणि दमदार मायलेजमुळे टोयोटाच्या कार खूप पसंत केल्या जातात. आता पुन्हा एकदा टोयोटाने बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. आपली नवीन कार देशातील बाजारपेठेत दाखल केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने त्यांचे बहुप्रतिक्षित वाहन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस GX (O) प्रकार लाँच केले आहे. हा नवीन GX(O) प्रकार नॉन-हायब्रिड आवृत्तीसाठी उपलब्ध असेल. G-SLF आणि GX या दोन प्रकारांमध्ये कंपनी आधीच पेट्रोल हाय क्रॉस विकत आहे. आता, GX(O) सह नवीन इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल सेगमेंट टॉप-एंड प्रकार म्हणून उपलब्ध असेल.

नवीन प्रकार GX ट्रिमपेक्षा वरचा असेल आणि त्याची किंमत GX व्हेरियंटपेक्षा १ लाख रुपये जास्त असेल. हे MPV सात आणि आठ सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये दिले जाईल. इनोव्हा हायक्रॉस GX (O) पेट्रोल २.०-लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे १७३hp पॉवर आणि २०९Nm टॉर्क निर्माण करते. हे फक्त CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल. इनोव्हा हायक्रॉसची दोन्ही इंजिन फक्त फ्रंट-व्हील ड्राइव्ह आहेत आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देत नाहीत. टोयोटा हायब्रिडचे मायलेज २३.२४kmpl आहे. त्याच वेळी, पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १६.१३kmpl चा दावा करण्यात आला आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस महिंद्रा XUV700 आणि Scorpio N, Hyundai Alcazar, MG Hector Plus आणि Tata Safari सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ सेडान कारला भारतीय बाजारात तुफान मागणी; Amaze अन् Tigor कारलाही टाकलं मागे )

कारमध्ये दिलेले अप्रतिम फिचर्स

नवीन प्रकारात Apple CarPlay/Android Auto, ड्युअल-टोन इंटीरियर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर ऑटोमॅटिक ब्लोअर कंट्रोल, ड्युअल-टोन सीट्स, सॉफ्ट-टच डॅशबोर्डसह १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात LED फ्रंट फॉग लॅम्प, रियर रिट्रॅक्टेबल सनशेड (फक्त सात सीटर), ३६०-डिग्री कॅमेरा आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील आहे. MPV ला डॅशबोर्डवर सॉफ्ट-टच आणि डोअर पॅनल्स आणि मागील सनशेड देखील मिळते. हे मॉडेल सात रंगांमध्ये उपलब्ध असेल.

किंमत किती असेल?

कंपनीने हे शक्तिशाली वाहन २०.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले आहे.