टोयोटा कंपनीचा भारतीय वाहन बाजारात चांगलाच जम बसला आहे. या कंपनीच्या वाहनांना बाजारात तगडी मागणी आहे. भारतीय बाजारात एमपीव्ही कारची मागणी वाढत चालली आहे. यातच टोयोटाच्या कारचीही विक्री भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस डिसेंबर २०२२ मध्ये पदार्पण केल्यापासून भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हायब्रीड कारपैकी एक राहिली आहे. MPV ची आरामदायी वैशिष्ट्ये, प्रीमियम वैशिष्ट्ये, कार्यक्षमता आणि SUV सारखी भूमिका यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय होण्यास मदत झाली आहे. लाँच झाल्यापासून सुमारे १३ महिन्यांत या कारचे ५० लाखाहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस लाइनअप आठ प्रकारांमध्ये येते. GX 7STR, GX 8STR, VX 7STR हायब्रिड, VX 8STR हायब्रिड, VX (O) 7STR हायब्रिड, VX (O) 8STR हायब्रिड, ZX हायब्रिड आणि ZX (O) हायब्रिड. त्याच्या बेस व्हेरिएंट GX 7STR ची किंमत १९.७७ लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंट ZX (O) Hybrid ची किंमत ३०.६८ लाख रुपयांपर्यंत जाते. या सर्व एक्स-शोरूम किमती आहेत.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहे. यामध्ये डायरेक्ट शिफ्ट CVT गिअरबॉक्स, २.०L इनलाईट-फोर, TNGA पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. त्याचबरोबर E-CVT गिअरबॉक्ससह फर्स्ट-इन-सेगमेंट २.०L TNGA पेट्रोल हायब्रीड सेटअपसह दुसरे इंजिन उपलब्ध आहे.

(हे ही वाचा : मारुतीने स्वस्त कारची किंमत आणखी केली कमी; १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ३५ किमी, पाहा नवीन किंमत…)

दोन्ही इंजिन पर्याय फक्त फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) प्रणालीसह येतात. त्याची हायब्रीड आवृत्ती २३.२५kmpl ची मायलेज देऊ शकते आणि नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन प्रकार १६.१३kmpl मायलेज देऊ शकते. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार बॉडी-ऑन-फ्रेम चेसेसवर तयार करण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये मस्क्युलर क्लॅमशेल बोनेट, डेटाइम रनिंग लाइट्ससह स्लीक एलईडी हेडलाइट्स, क्रोमसह हेक्सागोनल ग्रिल, रुंद एअर डॅम, सिल्व्हर स्किड प्लेट्स, साइड ORVM, क्रोम विंडो गार्निश, १८-इंच डिझायनर अलॉय व्हील देण्यात आले आहे.

नवीन इनोव्हा हायक्रॉस मजबूत असून याचा डिझाइन जबरदस्त आहे. ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेईल, यात काहीच शंका नाही. याची बोनेट लाइन, एक मोठी षटकोनी गनमेटल फिनिश ग्रिल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, सुपर क्रोम अलॉय व्हील्स आणि एक मोठा बंपर याच्या मजबूत लूकमध्ये आणखी भर घालतात. 

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota innova hycross has been on sale in our market for over a year and has achieved a milestone of 50000 sales pdb
First published on: 26-02-2024 at 17:20 IST