Toyota launch glanza cng : क्रुजर एसयूव्हींसाठी प्रसिद्ध असलेल्या टोयोटा मोटर्सने दोन नवीन सीएनजी वाहने लाँच करून सीएनजी प्रवासी वाहतूक सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. टोयोटाने सीएनजी किटसह ग्लान्झा हॅचबॅक सादर केली. नवीन टोयोटा ग्लान्झा ही मारुती सुझुकीच्या नवीन पिढीच्या बलेनो हॅचबॅक या कारवर आधारित आहे. या वर्षीच्या सुरुवातील ही कार लाँच झाली होती. टोयोटा एस एमटी आणि जी एमटी व्हेरिएंटमध्ये सीएनजी देईल आणि ते केवळ मॅन्युअल ट्रान्स्मिशन पावरट्रेनसह मिळेल.
एसयूव्ही अर्बन क्रुझर हायरायडर देखील सीएनजीसह मिळेल, अशी घोषणा देखील टोयोटाने केली आहे. ही एसयूव्ही फॅक्ट्री फिटेड सीएनजी किटसह एस आणि जी ग्रेडमध्ये मिळेल. मात्र, हायरायडरच्या सीएनजी व्हेरिएंटच्या किंमतीबाबत टोयोटाने खुलासा केलेला नाही. दोन्ही वाहनांसाठी बुकिंग सुरू झालेली आहे. ऑनलाइनद्वारे आणि देशातील सर्व डिलरशीपमध्ये बुकिंग करता येऊ शकते.
(४ रुपयांत करा १०० किमीचा प्रवास, घेऊन ‘या’ ही स्वस्त ई सायकल)
इंजिन
टोयोटा ग्लान्झा सीएनजी एस एमटी आणि जी एमटी या दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या सीएनजी कारमध्ये १.२ लिटर ४ सिलेंडर के सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे ७६.४३ बीएचपीची शक्ती आणि ९८.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. कारमध्ये ५५ लिटरचा सीएनजी टँक देण्यात आला आहे, जो १० किलोच्या बरोबरीचा आहे. कार प्रति किलो सीएनजीवर ३०.६१ किमीची मायलेज देते, असा दवा करण्यात आला आहे.
किंमत
ग्लान्झा ई सीएनजी एस एमटी या कारची किंमत ८ लाख ४३ हजार रुपये आहे, तर ग्लान्झा ई सीएनजी जी एमटी या कारची किंमत ९ लाख ४६ हजार रुपये आहे. टोयोटाने अर्बन क्रुझर हायड्रर ई सीएनजी कार देखील दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध केली आहे. जी एमटी २ डब्ल्यू डी आणि एस एमटी २ डब्ल्यू डी या दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची बुकिंग सुरू झाली आहे. मात्र, तिच्या किंमतीबाबात टोयोटाने खुलासा केलेला नाही.