टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने भारतात आपली पहिली मध्यम आकाराची एसयूव्ही ‘द अर्बन क्रूझर हाय रायडर’ सादर केली आहे. या कारची सुरूवातीची किंमत १५.११ लाख रुपये आहे. ही एसयूव्ही बाजारात ह्युंदाई क्रेटा, टाटा नेक्सॉनसारख्या एसयूव्हींना टक्कर देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने जुलैमध्येच कार सादर झाल्याची माहिती शेअर केली होती. नवीन एसयूव्ही २५ हजारांच्या रुपयांच्या टोकन रकमेसह बुक केली जाऊ शकते. ही कार तीन हाय एंड ट्रिम्समध्ये सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, एक इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, क्रूझ कंट्रोल आणि ९.० इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. यासह यात अनेक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत.
( आणखी वाचा : या ५ कारला बाजारात जोरदार मागणी, मात्र प्रतीक्षा कालावधी पाहून व्हाल निराश )
या कारची वैशिष्ट्ये
माईल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड इंजिन
‘द अर्बन क्रूझर हाय रायडर’ ही कार दोन इंजिन पर्यायांसह येते. यात पहिलं १.५ लीटर माइल्ड हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे, हे इंजिन १०० बीएचपी पॉवर जनरेट करू शकतं, तर दुसरं १.५ लीटर थ्री-सिलेंडर इंजिन असेल, हे इंजिन १७७.६ व्ही लिथियम आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल. हे इंजिन ११४ बीएचपी पॉवर जनरेट करेल.
२७.९७ किमी प्रति लीटर मायलेज
या कारमध्ये ५ स्पीड मॅन्यूअल, ६ स्पीड ऑटोमॅटिक आणि एक ई-सीव्हीटी युनिट मिळेल. हायरायडर ही फ्रंट व्हील ड्राईव्ह कार आहे. टोयोटा ३ वर्षांत १ लाख किमी आणि ५ वर्षांत २.२० लाख किमीची वॉरंटी देत आहे. स्पोर्टी १७-इंच अलॉय व्हील्स, जाड ब्लॅक बॉडी, ऍपल कार प्लेसह ९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल. सुरक्षेसाठी वायरलेस चार्जिंग पॅड आणि सहा एअर बॅग देण्यात आल्या आहेत.
७ सिंगल, ४ डबल टोन रंगामध्ये कार उपलब्ध
हाय रायडरच्या पुढील बाजूस स्लिम दुहेरी-स्तरीय दिवसा चालणारे दिवे मिळतात. कोणते स्फटिक अॅ क्रेलिक रंगाच्या लोखंडी जाळीला जोडलेले होते. कारच्या दाराला हायब्रिड बॅज आणि पारंपरिक एसयूव्ही प्रोफाइल मिळते. मागील बाजूस, सी-आकाराचे टेल लाइट आहेत, जे दुहेरी सी-आकाराच्या एलईडी घटकांशी जोडलेले असतील. ही कार सात सिंगल टोन आणि चार डबल टोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
या कारच्या सेफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ईबीडीसह एबीएस, सहा एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि अनेक महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स मिळतील.