scorecardresearch

Toyota Innova HyCross Price Hike: लोकप्रिय इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीत वाढ; खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग असे फिचर्स मिळतात.

Toyota Innova Hycross price hike
Toyota Innova Hycross- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Toyota Price Hike: भारतात फोर व्हिलर खरेदी करण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. अनेक वाहन कंपन्या आपले नवीन मॉडेल्स अनेक नवीन फीचर्ससह आणि टेक्नॉलॉजीसह लॉन्च करत असतात. Toyota या कंपनीने काही दिवसांपूर्वी नवीन MPV Innova HyCross भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. या एमपीव्हीला हायब्रीड इंजिनचा पर्याय देण्यात आला असून तिला एसयूव्हीच्या लुकमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या कारचे लॉन्चिंग झाल्यापासून कारच्या खरेदीला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान टोयोटो कंपनीने या कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Innova HyCross कारचे इंजिन आणि मायलेज

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV कारमध्ये २.० लिटरचे इंजिन ४ सिलेंडर असलेले हायब्रिड पॉवरट्रेनसह येते. हे इंजिन १८१ बीएचपी पॉवर निर्मण करते. तसेच या कोर्समध्ये वापरकर्त्यांना २३.२४ kmpl इतके मायलेज मिळते. तसेच Toyota Innova Highcross MPV या कारमध्ये १० इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स असे फीचर्स मिळतात. तसेच पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरे आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी देखील या कारमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा : नव्या अवतारामध्ये लॉन्च झाली देशातील सर्वात सुरक्षित SUV, २५ हजार रुपयांमध्ये मिळणार ‘हे’ जबरदस्त फिचर

किती होणार वाढ ?

टोयोटो कंपनीने या कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून कारच्या किंमतीमध्ये ७५,००० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान गाडीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे याची सुरुवातीची किंमत ही १८.५५ लाख रुपये इतकी झाली आहे. कंपनीने पेट्रोल व्हेरिएंटवर २५,००० आणि हायब्रीड व्हेरिएंटवर ७५,००० रुपयांची वाढ केली आहे. तसेच टॉप स्पेक GX 8-सीटर व्हेरिएंटसाठी तुम्हाला १९.४५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तेच स्ट्रॉंग हायब्रीड व्हेरिएंटच्या किंमती आता २४.७६ (एक्स शोरूम) पासून सुरु होतील.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 11:14 IST
ताज्या बातम्या