दुचाकी क्षेत्रात स्कूटरची मोठी रेंज आहे. मायलेज स्कूटरपासून ते स्पोर्टी डिझाइन आणि हायटेक फिचर्ससह स्कूटर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्वतःसाठी लांब मायलेज असलेली स्टायलिश स्कूटर खरेदी करायची असेल, तर येथे दोन लोकप्रिय स्कूटरचे तपशील दिले आहेत, जाणून घेऊयात. यामाहा Fascino 125 आणि टीव्हीएस Jupiter 125 या दोन स्कूटर तुलनेसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.
Yamaha Fascino 125: यामाहा फसीनो 125 स्कूटर ही लांब मायलेज असलेली प्रीमियम स्टाइल स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीने पाच प्रकारांसह लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडले जाते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबाबत, यामाहा दावा करते की ही फसीनो 125 ६८.७५ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. यामाहा फसीनो 125 ची सुरुवातीची किंमत ७२,५०० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ८१,३३० रुपयांपर्यंत जाते.
Rolls Royce ची करोना संकट काळतही विक्रमी झेप; मोडला ११७ वर्षांचा रेकॉर्ड
TVS Jupiter 125: टीव्हीएस ज्युपिटर ही त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने अलीकडेच एका नवीन अवतारात लॉन्च केली आहे. कंपनीने तिचे तीन प्रकार बाजारात आणले आहेत. स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने सिंगल सिलेंडर १२४.८ सीसी इंजिन दिले आहे जे ८.३ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या भागात डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आला आहे. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ५० किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, या स्कूटरची सुरुवातीची किंमत ७३,४०० रुपये आहे, जी त्याच्या टॉप वेरिएंटमध्ये ८१,३०० रुपयांपर्यंत जाते.