भारतीय लोक आपल्या बजेटनुसार गाड्यांमध्ये रस दाखवतात. जर तुम्ही लवकरच नवीन मोटरसायकल घेणार असाल, पण तुमचे बजेट कमी असेल, तर तुमच्यासाठी देशातील विश्वसनीय ब्रँड हिरो मोटोकॉर्पकडून दोन मोटरसायकल बाजारात उपलब्ध आहेत. या मोटरसायकलची फक्त किंमतच कमी नाही, तर या मोटरसायकल उत्तम परफॉर्मेंस आणि उत्तम मायलेजही देतात. हिरो एचएफ डिलक्स आणि हिरो एचएफ १००. या त्या दोन मोटरसायकल आहेत. जाणून घेऊया कोणती आहे सर्वोत्तम.

इंजिन आणि ट्रान्समिशन

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?

हिरो एचएफ १०० मध्ये ९७.२ सीसी ४-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, इंधन इंजेक्टेड इंजिन आहे. या मोटरसायकल ला 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हिरो एचएफ डिलक्स देखील OHC तंत्रज्ञानासह ९७.२ सीसी एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. ट्रान्समिशनसाठी, यात ४-स्पीड गिअरबॉक्स आहे. हिरो एचएफ १०० ला ऊर्जा देणारे इंजिन ८,००० आरपीएम वर ७.९१ Bhp कमाल पॉवर आणि ५,००० आरपीएम वर ८.०५ न्यूटन मीटर कमाल टॉर्क निर्माण करते. हिरो एचएफ डिलक्स मध्ये आढळलेले इंजिन ८,००० आरपीएम वर ८.२४ bhp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि ५००० आरपीएम वर ८.०५ न्यूटन मीटरचा कमाल टॉर्क जनरेट करते.

आणखी वाचा : अरे वा! आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मिळणार इन्कम टॅक्समध्ये सवलत, असा घ्या फायदा…

पेट्रोल टॅंक आणि मायलेज

हिरो एचएफ १०० एक लिटर पेट्रोलमध्ये ७० किमी पर्यंत धावू शकते. या मोटरसायकल मध्ये ९.१ लीटरची फ्यूल टॅंक आहे. हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल १ लिटर पेट्रोलमध्ये ८३ किमी पर्यंत लांब अंतर कापू शकते. या मोटरसायकलमध्ये ९.३ लीटरची फ्यूल टॅंक देण्यात आली आहे.

वजन आणि डाइमेंशन

हिरो एचएफ १०० चे एकूण वजन ११० किलोग्रॅम आहे. त्याची लांबी १९६५ मिमी, रुंदी ७२० मिमी आणि उंची १०४५ मिमी आहे. याला १६५ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स, १२३५ मिमीचा व्हीलबेस आणि ८०५  मिमीची सीडरची उंची मिळते.

हिरो एचएफ डिलक्स च्या किक व्हेरियंटचे वजन ११० किलोग्रॅम आहे, आणि हिरो एचएफ डिलक्स च्या सेल्फ व्हेरियंटचे वजन ११२ किलोग्रॅम आहे. त्याची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी आणि उंची १०४५  मिमी आहे. याचे ग्राउंड क्लीयरन्स १६५ मिमी आणि व्हीलबेस १२३५ मिमी आहे.

आणखी वाचा : अर्रर… महिंद्राच्या ‘या’ कारमध्ये आढळला मोठा दोष…! कंपनीने मागवली कार परत, आता होणार ‘हा’ नवीन बदल

ब्रेक आणि सस्पेंशन

हिरो एचएफ १०० ला १३० mm फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक आहेत. यात समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स सस्पेंशन आणि मागील बाजूस २-स्टेप अॅडजस्टेबल हाइड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर्स सह स्विंगआर्म आहे.

हिरो एचएफ डिलक्स ला १३० mm फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक मिळतात. याला समोरील बाजूस टेलीस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऑब्झर्व्हर आणि मागील बाजूस स्विंग आर्मसह २-स्टेज ऍडजस्टेबल रिअर सस्पेंशन मिळते.

किंमत

हिरो एचएफ १०० ची किंमत ५५,७६८ रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. हिरो एचएफ डिलक्स ची सुरुवातीची किंमत ६०,३०८ रुपये आहे आणि टॉप एंड व्हेरिएंटची किंमत ६५,९३८ रुपये (दिल्ली, एक्स-शोरूम) आहे.