scorecardresearch

भेटीला येत आहे Vaan Electric Moto ची ‘Urbansport’ ई-बाईक, अर्ध्या युनिटमध्येच चार्ज होते, फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घ्या

भारतीय स्टार्टअप कंपनी वान इलेक्ट्रिक मोटो प्रायव्हेट लिमिटेडने देशात आपली एक इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक अर्बनस्पोर्ट आणि अर्बनस्पोर्ट प्रो या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Vaan-Electric-Bike
( प्रतीकात्‍मक फोटो)

भारतीय स्टार्टअप कंपनी वान इलेक्ट्रिक मोटो प्रायव्हेट लिमिटेडने देशात आपली एक इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक अर्बनस्पोर्ट आणि अर्बनस्पोर्ट प्रो या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही बाईक्सची किंमत वेगवेगळी आहे. Urbansport ई-बाईकची किंमत ५९,९९९ रुपये आणि Urbansport Pro ची किंमत ६९,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक २५ किमी प्रतितास वेगाने धावते, जी ६० किमीची रेंज देते.

केंद्रीय कौशल्य विकास, उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हॅन इलेक्ट्रिक मोटो ब्रँड भारतात लॉन्च केला. गोवा, बंगलोर, मुंबई, हैदराबाद आणि इतर उच्च संभाव्य बाजारपेठांमध्ये बाईक्स लॉन्च करण्यापूर्वी ते सुरुवातीला कोचीमध्ये विक्रीसाठी जाईल. भविष्यात दिल्ली आणि इतर शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २ लाखांमध्ये Maruti Wagon R खरेदी करण्याची संधी, आवडली नाही तर परत करा

अर्धा युनिटच्या वीजमध्येच होते पूर्ण चार्ज
वान इलेक्ट्रिककडून असा दावा करण्यात आला आहे की, एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त अर्धा युनिट वीज लागेल, याची किंमत सुमारे ४-५ रुपये असेल. याशिवाय, २.५ किलो वजनाचा स्वॅपिंग बॅटरी पॅक, अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. हा बाईक पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतील.

विरोधी पक्षनेत्याने लॉंच केली बाईक
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते VD Satheesan आणि Oilmax Energy Pvt Ltd चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल गर्ग यांनी संयुक्तपणे व्हॅन ई-बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. एर्नाकुलमचे खासदार हिबी इडन यांनी या कार्यक्रमात व्हॅन ब्रँडचा लोगो लॉन्च केला. यावेळी माजी खासदार चंद्रन पिल्लई देखील उपस्थित होते.

आणखी वाचा : Tata Safari SUV ची डार्क एडिशन लॉंच, काय आहे वेगळं? जाणून घ्या

काय खास असेल ?
या बाइकच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, या दोन्ही इलेक्ट्रिक बाइक्समध्ये कॉम्पॅक्ट ६०६१ अॅल्युमिनियम युनिसेक्स फ्रेम, सॅडल, रिम्स आणि बेनेली बिसिलेटने डिझाइन केलेले हँडलबार आहेत, जी इटालियन ब्रँडची ई-बाईकमध्ये आहे. माहितीनुसार, VAAN ने अभियांत्रिकी आणि पुरवठ्यासाठी करार केला आहे आणि UrbanSport जोडीच्या विकासासाठी बेनेली टीमसोबत खोलात जाऊन काम केलं आहे.

व्हॅनचा दावा आहे की या बाईकमधील बॅटरी ही काढता येण्याजोगी आहे, सायकली शिमॅनो टूर्नी 7 स्पीड डेरेल्युअर गियर सिस्टम, फ्रंट, रियर डिस्क ब्रेक्स आणि स्पिनर यूएसए फ्रंट शॉकसह ही बाईक मिळते.

आणखी वाचा : मस्तच! अवघ्या ३ लाखांमध्ये खरेदी करा महिंद्रा KUV 100, जाणून घ्या सविस्तर ऑफर

कंपनीने काय म्हटले?
इलेक्ट्रिक पेडल असिस्ट सिस्टममध्ये २५० W हब माउंटेड इलेक्ट्रिक मोटर, ४८V, ७.५Ah काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आणि एकूण ५ इलेक्ट्रिक ‘गियर लेव्हल्स’ आहेत. व्हॅन अर्बनस्पोर्ट ई-बाईकमध्ये स्मार्ट एलसीडी डिस्प्ले आहे. अर्बनस्पोर्ट प्रो ही अधिक स्टायलिश आणि प्रीमियम ई-बाईक आहे जी अलॉय व्हील आणि इलेक्ट्रिक बाईक मिळते.

ज्यांना सायकल चालवायची आहे आणि थोडा वेगही घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही बाईक आणली असल्याचं कंपनीने म्हटलंय. ही बाईक ४० ते ५० वयोगटातील लोकांसाठी उत्तम असणार आहे. कंपनीने सांगितले की, ई-सायकलमध्ये पाच इलेक्ट्रिक गीअर्ससह पॉवर-असिस्टेड मोड आणि फुल-थ्रॉटल मोड असेल जो २५ किमी प्रतितास वेग मिळवू शकेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaan electric moto launch urbansport e bike which gets charged in half unit electricity know range and price prp

ताज्या बातम्या