First Flying Bike Video: उडणाऱ्या कार, उडणारी बस यापाठोपाठ आता एका उडणाऱ्या बाईकने ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. AERWINS XTurismo या हॉवरबाईकचा एक व्हिडीओ सध्या बाइकप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. या हवेत उडणाऱ्या बाईकची पहिली झलक खरोखरच थक्क करणारी आहे. ड्रोनप्रमाणे रचना असणाऱ्या या बाइकचे उच्च-प्रगत सेन्सर्स आणि तंत्रज्ञान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. XTurismo ही बाईक डेट्रॉईट ऑटो शो मधून पदार्पण करत आहे तत्पूर्वी तिचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. याचा व्हिडीओ Reuters या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

जगातील पहिल्या उडत्या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. XTURISMO हॉव्हर नावाची बाईक ६२ mph पर्यंत वेगात ४० मिनिटे उडण्यास सक्षम आहे. XTurismo मध्ये गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायब्रिड कावासाकी इंजिन आहे. या बाईकचे वजन सुमारे ६६१ पाउंड (२९९ किलो) आहे. XTURISMO hoverbike ही जगातील पहिली उडणारी बाईक असून नुकतेच तिचे अमेरिकेत पदार्पण केले.

Affordable Cars Option: कारमध्ये ६ एअरबॅग्ज होणार अनिवार्य; आजच पाहा ‘हे’ सर्वात स्वस्त व हाय-टेक गाड्यांचे पर्याय

पाहा उडणाऱ्या बाईकची झलक

अद्ययावत व एकमेव तंत्रज्ञान असल्याने सध्या तरी ही बाईक सामान्यांच्या खिशाला परवडण्याच्या पलीकडे आहे. ७७७,००० डॉलरची ही बाईक येत्या काळात स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा विश्वास कंपनीच्या सीईओंनी व्यक्त केला आहे. २०२३ – २०२५ च्या दरम्यान, कंपनीतर्फे XTurismo ची लहान आवृत्ती अमेरिकेत ऑफर केली जाऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जपानमध्ये, हॉवरबाइकला विमान मानले जात नाही म्हणून अशा बाईक वापरण्यासाठी विशेष परवान्याची आवश्यकता नसते. अमेरिकेत यासंदर्भातील नियम अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाहीत.