भारत सरकार देशात इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या कार्सना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या एका पॅनलने २०२७ पासून देशात डिझेलवर चालणाऱ्या कारवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरातील मोठ्या कार उत्पादन कंपन्यांनी यात पुढाकार घेतला आहे. आता यातच एका मोठ्या कंपनीने डिझेल कार विक्री थांबविली आहे.

फॉक्सवॅगन या वर्षाच्या अखेरीस नॉर्वेमध्ये अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) वाहनांची विक्री थांबवेल. म्हणजेच पुढील वर्षापासून कंपनी नॉर्वेमध्ये पेट्रोल किंवा डिझेल कार विकणार नाही. ते फक्त इलेक्ट्रिक वाहने (EVs) विकेल. नॉर्वेमधील फोक्सवॅगनची आयातदार मोलर मोबिलिटी ग्रुपने याबाबतची माहिती नुकतीच दिली आहे. फॉक्सवॅगन या वर्षी डिसेंबरमध्ये नॉर्वेमध्ये आपल्या शेवटच्या ICE कार विकेल आणि नंतर त्या बंद करेल. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व ICE कार ऑर्डर पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. त्यानंतर, ब्रँड फक्त त्याचे इलेक्ट्रिक मॉडेल्स विकेल.

(हे ही वाचा : ‘या’ मेड-इन-इंडिया स्वस्त एसयूव्हीमुळे बाकी कंपन्यांची उडाली झोप, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा, किंमत फक्त… )

इलेक्ट्रिक वाहने (EVs) घेण्यात नॉर्वे जगात आघाडीवर आहे. देशातील २० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त प्रवासी वाहने आधीच ईव्ही आहेत आणि नवीन वाहनांच्या विक्रीत सुमारे ८४ टक्क्यांनी हिस्सा ईव्हीचा आहे. नॉर्वेजियन रोड फेडरेशनच्या मते, प्लग-इन हायब्रिड जोडल्यावर हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिपोर्ट्सनुसार, नॉर्वेजियन सरकार २०२५ पर्यंत सर्व ICE वाहनांवर बंदी घालण्याची योजना आखत आहे. असे करणारा हा जगातील पहिला देश असेल. मात्र, फॉक्सवॅगनने या वर्षभरापूर्वीच देशात आयसीई वाहनांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता.