Volvo EX30 launched in India: वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली. Volvo कार इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार व्होल्वो ईएक्स30 च्या किंमतीची घोषणा केली आहे. आकर्षक लूक, टिकाऊपणा आणि शक्तिशाली बॅटरी असलेल्या या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत ४१ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, १९ ऑक्टोबर २०२५ पूर्वी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ती ३९.९९ लाख रुपयांच्या विशेष सवलतीच्या दरात मिळेल.
ही कार पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कारची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वोल्वोची ही तिसरी इलेक्ट्रिक कार असून, ती बेंगळुरूमधील होस्कोट येथील कंपनीच्या प्लांटमध्ये असेंबल केली जात आहे. भारतीय बाजारात ही कार फक्त मोठ्या ६९ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे.
हा ब्रॅंड सर्वाधिक सस्टेनेबल तसेच स्टाइलिश इलेक्ट्रिक कार म्हणून नावारुपाला आला आहे. ४१,००,००० रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमतीसह ईएक्स30 लक्झरी इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या साह्याने प्रवास अगदी सुलभ करण्यासाठी तयार आहे. या सणासुदीच्या हंगामात, वॉल्वो कार इंडियाने आपल्या डीलर्ससह दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ पूर्वी प्री-रिजर्व्ह केलेल्या ग्राहकांना ३९,९९,००० रुपयांच्या विशेष किंमतीत ईएक्स30 बुक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही विशेष ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. तरीच अधिक माहितीसाठी, ग्राहकांना त्यांच्या जवळच्या विक्रेत्याशी संपर्क साधता येईल. ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल आणि नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून डिलिव्हरी करण्यात येईल.
कारसोबत ११ किलोवॅटचा वॉलबॉक्स चार्जर मिळतो, ज्यामुळे बॅटरी ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी साधारणपणे ७ तास लागतात. कंपनी बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीची वॉरंटी देत आहे. याशिवाय, ३ वर्षांची वाहन वॉरंटी, ३ वर्षांचे वोल्वो सर्व्हिस पॅकेज आणि ३ वर्षांची रोडसाईड असिस्टन्स देखील मिळत आहे. ५ वर्षांचे मोफत डिजिटल सर्व्हिस सबस्क्रिप्शन, ‘कनेक्ट प्लस’ देखील दिले जात आहे. वोल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी दावा केला आहे की, ही कार आकर्षक डिझाइन, पॉवर आणि लक्झरी यांचा उत्तम संगम आहे, ज्यामुळे ती ग्राहकांना आकर्षित करेल.