आपण चारचाकीमधुन बऱ्याच वेळा प्रवास करतो. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर आपण आवश्यक ती सर्व काळजी घेतो. पण कधीकधी संपुर्ण काळजी घेऊनही आपण काही अनपेक्षित अडचणीत सापडतो. त्यातीलच एक म्हणजे गाडीत अडकणे. दरवर्षी गाडीत अडकल्यामुळे बऱ्याच जणांना अडचणींना सामोरे जावे लागते, त्यातील काही दुर्दैवी व्यक्तीच्या जीवावर देखील बेतते. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे हे प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जर कधी गाडीत अडकलो, तर अशा वेळी पॅनिक होणे, टेन्शन येणे स्वाभाविक आहे. परंतु अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करावा कारण टेन्शनमध्ये समोर असलेले पर्यायसुद्धा दिसत नाहीत. तुम्ही जर गाडीमध्ये अडकला किंवा गाडीमध्ये अडकलेल्या एखाद्या व्यक्तीला जर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया.

आणखी वाचा : दिवाळीआधी नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडयांवर मिळतोय बंपर डिस्काउंट

गाडीची काच तोडण्याचा प्रयत्न करा
गाडीत नेहमी एक हातोडा ठेवा, ज्यामुळे गाडीत अडकल्यावर काच फोडण्यास मदत होईल. यासाठी गाडीत अडकण्याची वाट बघु नका, त्याआधीच असा गंभीर प्रसंग टाळण्याची तयारी ठेवा. हातोडा वापरून सहजपणे तुम्हाला गाडीची काच फोडता येईल आणि तुमचा जीव वाचेल. जर गाडीत काच फोडण्यासाठी जड सामान किंवा हातोडा नसेल, तर सीटच्या मागे हेडरेस्ट असतो त्याचा वापर करून काच तोडु शकता.

काच कोपऱ्यातून तोडण्याचा प्रयत्न करा

विंडशिल्ड आणि त्यामागच्या काचेमध्ये विशेष सेक्युरिटी काच बसवलेली असते. त्यामुळे ती काच फोडणे कठीण असते. अशावेळी विंडशिल्ड आणि त्यामागील काच न फोडता इतर दोन काच फोडण्याचा प्रयत्न करा. इतर दोन काच फोडणे अधिक सोपे होईल. तसेच काच कोपऱ्यातून फोडण्याचा प्रयत्न करा. कोपऱ्यातून काच फोडण्याचा प्रयत्न केल्यास काच लगेच फुटेल आणि तुम्हाला लगेच सुरक्षित बाहेर निघता येईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What to do after getting stuck in car use these tricks to get out pns
First published on: 07-09-2022 at 21:37 IST