बाईक चालवणं हे जवळपास प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. आता मुलीही बाईक चालवण्यामध्ये तरबेज झाल्या आहेत. पण बाइकच्या डिस्क ब्रेकमध्ये लहान छिद्रे का असतात आणि डिस्क ब्रेकवर त्यांचे कार्य काय असते हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? डिस्क ब्रेकवर केवळ डिझाइन म्हणून हे छिद्र तयार केलेले नसून ते बनवण्यामागेही एक खास कारण आहे. आज आपण हे कारण आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • डिस्क ब्रेक थंड ठेवतात

बाइक जेव्हा ब्रेक लावते तेव्हा त्याच्या डिस्क ब्रेकवर घर्षण होते आणि डिस्क गरम होते. डिस्कच्या अतिउष्णतेमुळे ब्रेकिंग कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो आणि ब्रेक कॅलिपर अधिक लवकर झिजतात. डिस्कच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी डिस्क ब्रेकवर लहान छिद्र केले जातात जेणेकरून ते थंड राहण्यास मदत होईल.

बाइक चालवताना, डिस्क ब्रेकवरील छोट्या छिद्रांमधून हवा वेगाने आरपार जाते, यामुळे डिस्क थंड राहते. जर डिस्कवर छिद्रे पाडली गेली नाहीत, तर डिस्क पॅडच्या घर्षणामुळे डिस्क ब्रेक जास्त गरम होईल. असे झाल्यास डिस्क पसरून त्यात क्रॅक येऊ शकतो.

  • डिस्कचे वजन कमी होते

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डिस्क ब्रेकवर बनवलेली छिद्रे डिस्कचे वजन कमी ठेवतात. यामुळे संपूर्ण बाईकचे वजन ३००-५०० ग्रॅमने कमी होते. जरी, हे वजन तुम्हाला फारसे वाटत नसेल, तरीही वाहनांच्या बाबतीत, हे वजन त्यांच्या कामगिरीवर परिणाम करते. बाईकच्या वजनात एक लिलोग्राम कमी केल्यानेही मोठा फरक पडू शकतो, त्यामुळे बाईकचे १०० ग्रॅम वजनदेखील खूप फरक आणू शकते.

कार विकत घ्यायची आहे? पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; पाहा दमदार मायलेजसह आकर्षक फीचर्स

  • पावसात डिस्क कोरडी ठेवतात

या सर्वांव्यतिरिक्त, डिस्क ब्रेकवर दिलेली छिद्रे आणखी एक मोठी भूमिका बजावतात. जर तुम्ही पावसात बाईक चालवत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की पावसामध्ये बाईकचा ब्रेक उशिरा लागतो. ब्रेक पॅड पाण्यामुळे ओले आणि निसरडे होतात, यामुळे असे घडते. अशा परिस्थितीत वेळीच ब्रेक न लागल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते.

तसेच, डिस्क ब्रेकवर येणारे पाणी पावसात लवकर बाहेर पडू शकेल आणि डिस्क कोरडी राहील, यासाठीही डिस्क ब्रेकमध्ये छिद्र केले जातात. जर डिस्कला ही छिद्रे नसतील तर, पाण्याचे थेंब डिस्कला चिकटून राहतील ज्यामुळे ब्रेक निसरडे होईल आणि वेळेत लागणार नाही.

  • छिद्रांमुळे घर्षण होते

डिस्क ब्रेकमध्ये छिद्र बनवण्याचे एक सामान्य परंतु अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे डिस्क प्लेट आणि ब्रेक पॅड यांच्यात घर्षण निर्माण करणे. जेव्हा डिस्क ब्रेकवरील लहान छिद्रे ब्रेक पॅडमधून जातात, तेव्हा ब्रेक पॅडमध्ये डिस्क ब्रेकच्या कोपऱ्यातून घर्षण निर्माण होते, ज्यामुळे बाइकची उच्च वेगाने थांबण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do bike disc brakes have holes you will also be surprised to know the reason pvp
First published on: 22-09-2022 at 17:32 IST