Yamaha R3 and MT-03 launched in India: यामहा ही जपानची दुचाकी निर्माता कंपनी आहे. जपानी दुचाकी निर्माता कंपनी यामाहाने भारतीय बाजारात नवे पाऊल टाकले आहे. जपानी दुचाकी निर्माता कंपनी यामाहाने भारतीय बाजारात नवे पाऊल टाकले आहे. आता प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने भारतीय बाजारात आपल्या दोन बाईक लाँच केल्या आहेत. या बाईक जबरदस्त फीचर्सने रंगलेल्या आहेत. कंपनीने Yamaha MT-03 आणि YZF-R3 या दोन बाईक कंपनीने लाँच केल्या आहेत. चला तर पाहूया या दोन बाईकमध्ये काय आहे खास…

MT-03 हे कंपनीचे नवीन मॉडेल आहे. R3 हे मॉडेल २०२० मध्ये बंद केले गेले होते. यामाहाचे चाहते अनेक दिवसांपासून MT-03 या बाईकची वाट पाहत होते. अखेर ही बाईक लाँच झाली आहे. MT-03 प्रथमच भारतीय बाजारपेठेत आणण्यात आले आहे. दोन्ही मोटारसायकल Yamaha MT-03 आणि YZF-R3 एकाच डायमंड-प्रकारच्या ट्यूबलर फ्रेमवर आधारित आहेत. तथापि, बॉडीवर्क वेगळे आहे. MT-03 मध्ये कमी बॉडीवर्क आणि सरळ स्थिती आहे तर R3 मध्ये पूर्ण फेअरिंग, क्लिप-ऑन बार आणि टक-डाउन राइडिंग पोझिशन आहे.

MT-03 आणि YZF-R3 इंजिन

स्ट्रीट नेकेड MT-03 आणि फुल-फेअर YZF-R3 समान इंजिन सामायिक करतात. दोन्ही बाईक ३२१cc, लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिनसह येतात, जे ४१bhp आणि २९.५Nm आउटपुट देतात. इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

(हे ही वाचा : Royal Enfield च्या ‘या’ बाईकसमोर बुलेट, हंटरही विसरुन जाल, बाजारात येतेय नवी बाईक; कधी होणार दाखल? )

MT-03 आणि YZF-R3 वैशिष्ट्ये

दोन्ही मोटारसायकलमध्ये नॉन-एडजस्ट USD फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक, १७ इंच चाके, ड्युअल चॅनल ABS, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. यामाहा MT-03, मिडनाईट सायन आणि मिडनाईट ब्लॅक सारख्या कलर पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे. Yamaha R3 आयकॉन ब्लू आणि यामाहा ब्लॅक सारख्या कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत

Yamaha MT-03 आणि R3 भारतात सादर झाल्या असून ज्यांच्या एक्स-शोरूम किमती अनुक्रमे ४.५९ लाख आणि ४.६४ लाख रुपये आहेत. या बाईकची डिलिव्हरी जानेवारी २०२४ मध्ये सुरू होईल असे सांगितले जात आहे.