सध्याच्या स्कूटर सेगमेंटमध्ये मायलेज आणि स्टायलिश डिझाइन या दोन फीचर्सना सर्वाधिक मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन दुचाकी उत्पादक कंपन्यांनी किफायतशीर मायलेज असलेल्या स्टायलिश स्कूटर बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या स्टायलिश आणि लांब मायलेज स्कूटरपैकी एक म्हणजे Yamaha RayZR 125 हायब्रीड स्कूटर ही त्याच्या मायलेज, स्टाईल आणि फीचर्ससाठी पसंत केली जात आहे.

Yamaha RayZR 125 Hybrid Base Variant Price
Yamaha Ray ZR 125 च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ८०,२३० रुपये आहे आणि ऑन-रोड असताना ही किंमत ९२,९०० रुपयांपर्यंत जाते. या स्कूटरची किंमत जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला सुलभ फायनान्स प्लॅनसह खरेदी करण्याचे तपशील माहित असणे गरजेचे आहे.

Yamaha RayZR 125 Hybrid Base Variant Finance Plan
जर तुम्हाला ही स्कूटर सोप्या पद्धतीने खरेदी करायची असेल तर तुम्हाला फक्त ९ हजार रुपयांची गरज आहे. ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक फायनान्स प्लॅनद्वारे या स्कूटरच्या खरेदीवर वार्षिक ९.७ टक्के व्याजदरासह ८३,९०० रुपये कर्ज देईल.

आणखी वाचा : यंदाच्या नवरात्रीमध्ये २९ हजारांच्या डिस्काउंटवर खरेदी करा ‘ही’ कार

हे कर्ज पास केल्यानंतर, तुम्हाला ९ हजार रुपये लागतील जे तुम्हाला या स्कूटरचे डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला पुढील ३६ महिन्यांसाठी २,६९५ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

फायनान्स प्लॅन जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या स्कूटरचे मायलेज ते इंजिन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनपर्यंतचे संपूर्ण तपशील माहित असणे गरजेचे आहे.

स्कूटरमध्ये १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.२ PS पॉवर आणि १०.३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरचे ट्रांसमिशन ऑटोमॅटिक आहे.

मायलेजबद्दल, यामाहाचा दावा आहे की ही स्कूटर ७१,३३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवण्यात आले आहेत. तसेच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.