Festival Offers In Yamaha Bikes and Scooter: सणासुदींना सुरुवात झाली आहे. खास नवरात्रीनिमित्त दुचाकी कंपनी आणि चारचाकी कंपनी आपल्या गाड्यांवर सवलत देतात. असे असताना खास नवरात्रीनिमित्त यामाहा कंपनी आपल्या गाड्यांवर ऑफर देत आहे. आपण जाणून घेऊया कोणत्या गाड्यांवर किती सवलत आहे. महाराष्ट्र नवरात्रीचा उत्सवी उत्साह साजरा करण्यासाठी सज्ज असताना इंडिया यामाहा मोटर प्रदेशामधील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या शुभप्रसंगी यामाहा त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल्स व स्कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्स देत आहे, ज्यामुळे ही तुमच्या पसंतीची यामाहा दुचाकी खरेदी करण्याची परिपूर्ण वेळ आहे.
यामाहाच्या नवरात्री स्पेशल ऑफर्स:
- R15 V4: जवळपास Rs.१५,७३४ पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. ६,५६० विमा फायदे.
- MT-15: जवळपास Rs. १४,९६४ पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. ६,५६० विमा फायदे.
- FZ-S Fi Hybrid: जवळपास Rs. १२,०३१ पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs.६,५०१ विमा फायदे.
- Fascino 125 Hybrid: जवळपास Rs. ८,५०९ पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. 5,401 विमा फायदे.
- RayZR 125 Fi: जवळपास Rs.७,७५९ पर्यंत जीएसटी फायदा आणि Rs. ३,७९९ फायदे.
यामाहाच्या मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या प्रीमियम श्रेणीसह नवरात्री सण साजरा करा, ज्या प्रत्येक राइडमध्ये उत्साह आणि कार्यक्षमतेची भर करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. तुमच्या जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या फेस्टिव्ह ऑफर्सचा आनंद घ्या.