प्रिय मित्रा,

स.न.वि.वि.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
Viral video of a young man puts fire cracker between legs Diwali crackers stunt video went viral on social media
VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या

या देशातील लोकांना भेटण्याचे मुख्य कारण म्हणजे हे लोक फार कामसू आहेत. दिवसाचे १८-१८ तास काम करण्याच्या कथा जगभरात पोहोचवल्या गेल्यात. आठवड्याचे ७० तास काम केल्याची जगभरात वदंता होती. पण या गुणांमध्ये सांस्कृतिक उत्सवाकडून खोडा घातला जातो. अशा कायम कष्टाळू आणि कामसू लोकांच्या जगण्यात टपाटप सण टाकले जातात. बिचाऱ्या लोकांच्या वेळापत्रकात एकामागून एक सण येतात आणि मग सणांचे उत्साही उत्सव केले जातात. त्यांच्या कामाचे ७० तास या डोळ्यांनी वारताना पाहिले आहेत हो. असो. माझ्यासारख्या परदेशी माणसाला एकेक उत्सव येण्याची चाहूल इथल्या रस्त्याकडल्या विक्रेत्याकडे लागते.

आता विक्रीला दिसताहेत ते रंगबिरंगी कपडे. तर चित्रास कारण की, एकाच रंगाचा धागा आणि त्यापासून कपडा बनवणे तसे सोपे. डाय करून विविधरंगी कपडे बनवणे तेही सोपेच. अनेक रंगीत धागे एकात एक विणून हातमाग यंत्रावर कपडा (वस्त्र) तयार करणे महाकठीण व महागडे काम. एखाद्या रंगीत कपड्यावर विणून चित्र काढणे म्हणजे वेळ आणि डोळेखाऊ काम. त्यातल्या त्यात सोपे म्हणजे काही लोक हाताने कपडे रंगवण्याचेही काम करतात. कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिवतातच. ते कमी की काय म्हणून गोल, चौकट छोट्या आकाराचे आरसे, रंगीत मोती, मणी, शिवून लटकवले जातात. त्याला साजेसे खोटे मोठे दागिने घातले जातात. हे इतके सर्व का? तर आकर्षक कपड्यांच्या गर्दीत आपले कपडे अधिक आकर्षक दिसण्यासाठी. पण त्यामुळे अख्खी गर्दी आकर्षक होत नाही, तर आपलेच डोळे चमकू लागतात.

हेही वाचा >>> बालमैफल: ‘नाचाओधासां’ मुलांनो…

एरवी हे लोक शेकडो दुकानांची माळ असणाऱ्या एकाच ब्रँडचे एकसारखेच डिझाईन असणारे कपडे आनंदाने वापरतात. पण सण, उत्सव असला की असा भडक रंगीत मामला होतो. मग सर्व लोक रस्त्यावरच्या बाकड्याला झाकून टाकतात.

आता तर हे लोक पेपरात वाचून अमुक दिवशी अमुक एकच रंग वापरतात. असा शाळेप्रमाणे युनिफॉर्म घालण्याचा प्रकार तुझ्या देशातली मोठी माणसे करतात का? तुझ्याकडे असे नाच-गाणे उत्सव असतात का? तिथले कपडे कसे असतात? रंगीत की एकरंगी? कपड्यांवर डिझाईन म्हणून काय असते? प्राणी, फुले, पक्षी की भुते? नीट पाहा, जे बघितले ते मला चितारून पाठवशील.

तुझाच मित्र, श्रीबा

shriba29@gmail.com