५ झाडाच्या चिकाने बनतो
लिहिताना चुकलं तर आठवतोसुंदर आकार, रंगीत छान
आता तर विसरू नये तुम्ही म्हणून
देता मला लेखणीमागे स्थान
-खोडरबर
५ मी नाही कोणी पक्षी
तरी हवेत उडतो
एका ठिकाणावरून
दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतो
मला बघताच तुम्ही
आठवणीत रमता
अलगद मला तळव्यात धरून
परत सोडून देता
माझ्या पांढऱ्या रंगामुळे
आजीबाईचं बिरुद
माझ्या पाठी लावता
-म्हातारीचं पीस
गुलाबी लाल ते मरून असा माझा रंग
त्याला शोभेसे असे दाणेदार अंग
त्यात भली मोठी चॉकलेटी बी
त्यावर पारदर्शक मोत्याचा गर
जीवनसत्त्वाने भरपूर
पाण्याची मात्रा असते खूप
सरबत, फुट्र सलाड,आइस्क्रीममध्ये वापरतात
लहान-मोठे अगदी आवडीने हे फळ खातात
-लिची