साहित्य : दोन रंगी कागद, काळा, हिरवा टिंटेड पेपर, टिकल्या, कात्री, गम. इ.
कृती : साधारण १० सेंमी x १० सेंमी दोन रंगी कागद घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे उलटय़ासुलटय़ा दुमडी घाला. ९-१० क्रमांकच्या आकृतीत डोंगरासारखा (माउंट फोल्ड) त्रिकोण आत ढकलायचा. त्यानंतर १३ क्रमांकच्या आकृतीत चौकोनावर अंगठय़ाने हलकेच दाब देऊन ओढायचे. या वेळी बाहेरील बाजूस व उजव्या हाताने मागील टोक धरून ठेवा. हलक्या हाताने पायाचे त्रिकोण उघडा मग मानेचा भाग आपोआपच वर येईल. काळ्या कागदाच्या चपटय़ा साधारण १ सेमी रुंद व घोडय़ाच्या मानेच्या आकाराच्या दुमडीवर कात्रीने कात्रीने छोटे-छोटे कातरून घ्या. अर्धवट अंतराच्या आत छाटत जा. आयाळ बनेल. अशाच पद्धतीने शेपूटसुद्धा बनवा. खोगीर बनविण्यासाठी रंगीत टिंटेड पेपर अर्धगोलात दुमडून कापा. घोडय़ाला काळ्या कागदाची छोटी पट्टी चिकटवून तोंड बनवा. डोळ्यांच्या ठिकाणी काळी व खोगीराला रंगीत टिकल्या लावून सुशोभित करा.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
आर्ट कॉर्नर : अबलक खबलक घोडोबा
साहित्य : दोन रंगी कागद, काळा, हिरवा टिंटेड पेपर, टिकल्या, कात्री, गम. इ. कृती : साधारण १० सेंमी x १० सेंमी दोन रंगी कागद घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे उलटय़ासुलटय़ा दुमडी...
First published on: 26-01-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicraft

