साहित्य :
रिकामा चॉकलेट्सचा खोका,  गम.
कृती : चॉकलेट्स फस्त करून झाली, की जे रिकामं खाच्यांचं खोकं उरतं त्याचं मस्तपैकी आपल्या कानातल्यांची काळजी घेणारं स्टॅण्ड बनवता येईल. आपले सगळे हुक्सवाले (लटकन) पोलादी काडी असलेले कानातले गहाळ होऊ नयेत म्हणून या स्टॅण्डचा उपयोग करता येईल. या रिकाम्या खोक्यातील खाचांच्या पातळ प्लॅस्टिकच्या खोक्याला हलकेच काढा व उलटे करा. प्रत्येक खाचात एक जोडी असे कानातले टोचून छिद्र पाडा व सगळे खाचे भरून टाका. जर फिरकीचे कानातले लावायचे नसतील, तर हा स्टॅण्ड तुम्ही (कपाटाच्या) ड्रेसिंग टेबलच्या दाराला आतील बाजूने चिकटवूनसुद्धा वापरू शकता. काय मग करणार ना, प्लॅस्टिकचे रिसायकल कान केअर बॉक्स!