एका रविवारी पाच मित्र-मत्रिणी प्राणिसंग्रहालयात फिरायला गेले होते. ते वेळेच्या आधी पोहोचल्याने एका रांगेत उभे राहून प्राणिसंग्रहालय उघडण्याची वाट पाहात होते. प्रत्येकाचा आवडता प्राणी वेगवेगळा आहे. तिथे त्यांना वेगवेगळ्या रंगाचा फुगा भेट मिळाला.
खाली दिलेल्या अटींनुसार ते कोणत्या क्रमाने उभे आहेत, कोणाला कोणता प्राणी आवडतो आणि कोणाला कोणता फुगा मिळाला ते सांगा.
क्रम- पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा
मुला-मुलींची नावे- आर्यन, शौर्य, सुरभी, अवनी, ईशा
आवडता प्राणी- वाघ, सिंह, माकड, जिराफ, झेब्रा
फुग्यांचा रंग- लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी

१) जिला वाघ आवडतो ती रांगेत तिसरी आहे, पण ती ईशा नाही. तिला लाल आणि पिवळा फुगा मिळालेला नाही.
२) आर्यन शौर्यच्या मागे उभा आहे. पण आर्यन रांगेत शेवटी उभा नाही.
३) अवनीला वाघ आणि झेब्रा आवडत नाही.
४) अवनी आणि ईशाला लाल किंवा पिवळा फुगा मिळालेला नाही.
५) शौर्यजवळ पिवळा फुगा नाही.
६) ज्याचा आवडता प्राणी झेब्रा आहे त्याला निळा फुगा मिळालेला नाही आणि तो रांगेत चौथा आहे.
७) ज्याला हिरवा फुगा मिळाला त्याला सिंह खूप आवडतो.
८) आर्यनचा आवडता प्राणी जिराफ नाही.

उत्तर
रांगेतील तिसऱ्या मुलीला वाघ आवडतो. रांगेतील जे चौथे उभे आहे त्याला/ तिला झेब्रा आवडतो. तसेच ज्याला/ जिला हिरवा फुगा मिळाला त्याला/ तिला सिंह आवडतो. या गोष्टी स्पष्ट आहेत. दुसऱ्या अटीनुसार आर्यन रांगेत पाचवा नाही, तसेच तो शौर्यच्या मागे उभा आहे. म्हणजेच शौर्य चौथा असणार नाही. रांगेतील तिसरी उभी असणारी मुलगी आहे. त्यामुळे शौर्य रांगेत पहिला व आर्यन दुसरा असला पाहिजे.
आठव्या अटीनुसार आर्यनला जिराफ आवडत नाही. म्हणजे त्याचा आवडता प्राणी माकड असेल. त्यामुळे शौर्यला जिराफ आवडत असला पाहिजे.
तिसऱ्या अटीनुसार अवनीला वाघ आणि झेब्रा आवडत नाही म्हणजे तिचा सिंह आवडता असेल. ती रांगेत पाचवी असून तिच्या फुग्याचा रंग हिरवा आहे.
पहिल्या अटीनुसार ईशा तिसरी नाही म्हणजेच ती चौथी उभी आहे. त्यामुळे सुरभी तिसरी आहे. पहिल्या, चौथ्या व पाचव्या अटीनुसार सुरभी, अवनी, ईशाला लाल व पिवळा फुगा मिळाला नाही. म्हणजेच आर्यनला पिवळा फुगा मिळाला आणि शौर्यला लाल फुगा मिळाला.
सहाव्या अटीनुसार ज्याला झेब्रा आवडतो, म्हणजेच ईशाला निळा फुगा मिळालेला नाही त्यामुळे ईशाला गुलाबी आणि सुरभीला निळा फुगा मिळाला