स्नेहल बाकरे

‘‘अरे तन्मय, शाळेला आज सुट्टी आहे ना, तरीही तू सकाळी एवढया लवकर उठून काय करतोयस?’’ – बाबा.

women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

तन्मय बाल्कनीतूनच, ‘‘व्यायाम करतोय बाबा. संपत आलंय, आलोच एक मिनिटात.’’

‘‘अरे वा तन्मय, पण याआधी तर शाळेसाठीसुद्धा लवकर उठायचा तुला कंटाळा यायचा आणि आता तर सुट्टी असूनही तू एवढया लवकर उठून व्यायाम करतोयस?’’

‘‘गेल्या आठवडयात आमच्या एका सरांनी आम्हाला अर्ली टू बेड अर्ली टू राइज मेक्स यू हेल्दी, वेल्दी अँड वाइज याचं महत्त्व सांगितलं. ते सांगत होते, जगातले किती तरी महान, हुशार लोक हा नियम पाळतात आणि म्हणूनच ते इतके यशस्वी झालेत.’’

‘‘अगदी बरोबर. सकाळच्या फ्रेश हवेमध्ये व्यायाम केल्यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपली बुद्धी तल्लख राहते. तुम्ही तर शाळेत जाणारी मुलं- तुम्हाला तर किती तरी नवीन गोष्टी शिकायच्या आणि लक्षात ठेवायच्या असतात. सोबत भरपूर मैदानी खेळ खेळायला शरीरात तेवढी ऊर्जाही हवीच. सकाळच्या कोवळया उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व असतं. त्यानं तुमची हाडं मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही तर रोज सकाळी लवकर उठलंच पाहिजे.’’

‘‘म्हणून तर बाबा मी येत्या नवीन वर्षांत हाच संकल्प केलाय की, शाळेची वेळ जरी बदलली तरी मी मात्र रोज सकाळी लवकर उठून किमान पंधरा मिनिटं का होईना व्यायाम करणारच. आणि तुम्ही म्हणतातच ना- कल करे सो आज कर, आज करे सो अब.’’

बाबा त्याची पाठ थोपटत म्हणाले, ‘‘शाब्बास. आता हा संकल्प कधीही मोडू नकोस.’’

‘‘बाबा, तुम्ही या वर्षी कोणता संकल्प केलाय? आणि आई, तू काय करायचं ठरवलंयस?’’

‘‘मी ठरवलंय की या वर्षभरात निदान पन्नास पुस्तकं तरी वाचायचीच.’’ – इति बाबा.

‘‘मी रोज मॉर्निग वॉकला जायचं ठरवलंय, रोज किमान १०,००० पावलं तरी चालयचंच.’’ आई म्हणाली.

‘‘मला ना एक नवीन कल्पना सुचलीये. आपण जे ठरवलं ते तर करूयाच, पण त्यासोबत आपण अजून एक संकल्प करू या का?’’ बाबा म्हणाले.

‘‘हो चालेल बाबा, पण नक्की काय करायचं?’’ तन्मयनं कुतूहलानं विचारलं.

‘‘आज-काल आपण छोटया-मोठया गोष्टींसाठी म्हणजे साधा एखादा हिशोब करणं, आपल्या नातेवाईकांचा पत्ता शोधणं किंवा आपल्या जवळच्या लोकांच्या वाढदिवसाच्या तारखांची नोंद करणं.. अशा साध्या साध्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळेला मोबाइलमधल्या वेगवेगळया अ‍ॅप्सची मदत घेतो. आता आजकाल कोणाकडे एवढा वेळच नसतो आणि या अ‍ॅप्सला कोणतंही काम सांगितलं की ते अल्लादिनच्या चिरागमधल्या जिनीसारखं चुटकीसरशी काम करतात.’’ बाबांनी आपलं मत मांडलं.

‘‘बाबा, आमच्या शाळेतली काही मुलं तर प्रोजेक्ट बनवायलासुद्धा यूटय़ूब, गूगलवरून आयडिया घेतात.’’

‘‘आपल्याला यांची मदत होते, काम पटकन होतं म्हणून आपण कुठलाही विचार न करता आपली बरीचशी कामं या अ‍ॅप्सवर सोपवतो. पण तुम्ही कधी विचार केलात का की, आपल्या मोबाइलमध्ये सगळे नंबर सेव्ह असतात, म्हणून आपल्याला साधे जवळच्या लोकांचे नंबर्सही पाठ नसतात. रोजच्या बऱ्याच कामांसाठी आपण यांच्यावर अवलंबून राहायला लागलोय. ‘कठीण समय येता अ‍ॅप्स कामास येते’ अशी परिस्थिती झालीय आपल्या सगळयांची. आपल्या बुद्धीवर जराही जोर न देता चुटकीसरशी काम व्हावं म्हणून आपण सतत यांची मदत घेत असतो. त्यामुळे आपला उजवा मेंदू आळशी बनत चाललाय.’’ – बाबा एकदम काळजीच्या स्वरात म्हणाले.

‘‘जसे आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे असतात की नाही तसंच प्रत्येक माणसाला दोन मेंदू असतात – उजवा आणि डावा मेंदू. आपल्या डाव्या मेंदूत जुन्या गोष्टी साठवल्या जातात, तर उजव्या मेंदूत नवनवीन कल्पना येत असतात.’’ – आईनं तन्मयला अधिकची माहिती पुरवली.

‘‘पण जर आपण या मेंदूला एखादी गोष्ट कशी करायची? एखादं चित्र कसं काढायचं? एखादं अवघड स्पेलिंग मनाने कसं तयार करायचं? असे प्रश्न विचारलेच नाहीत तर तो एक दिवस काम करायचं बंद होईल. त्याला नवीन कल्पना सुचणारच नाहीत आणि एक दिवस पुरातन मानवाच्या शेपटीसारखा तोसुद्धा निकामी होऊन जाईल. आणि निसर्गाचा नियमच आहे- वापरा नाही तर गमवा. तसंच जर आपण आपल्या मेंदूला विचाररूपी किंवा नवनवीन कल्पना तयार करण्याचा व्यायाम करू दिला नाही तर एक दिवस तोपण कमकुवत होऊन जाईल.’’ – आई.

‘‘पण बाबा, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?’’

त्यासाठी आपण छोटया छोटया गोष्टींत लगेचच इतर साधनांची मदत न घेता सर्वात पहिलं ते काम आपल्या मेंदूकडून करून घ्यायचं. म्हणजे बघ, शाळेत तुम्हाला निबंध लिहायला सांगतात किंवा विज्ञान अथवा भूगोलाचा प्रकल्प तयार करायला सांगतात, त्या वेळेला लगेचच मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर त्याबद्दलची माहिती शोधण्याऐवजी आपल्याला निबंधामध्ये कशा प्रकारे माहिती लिहायची आहे याची छोटीशी यादी तयार करून त्याबद्दल तुम्ही मित्रांसोबत किंवा घरातील लोकांसोबत चर्चा करायची. जमलंच तर एखाद्-दुसरं पुस्तक वाचायचं, त्यातून माहिती घ्यायची आणि मग तो निबंध लिहायचा. प्रकल्प तयार करतानासुद्धा लगेचच यूटय़ूबवर जाऊन संपूर्ण प्रकल्प कसा करायचा हे बघण्यापेक्षा आपण या प्रकल्पात काय काय मांडू शकतो. काही नवीन विचार करून तो प्रकल्प अजून कसा आकर्षित करता येईल, यावर विचार केला पाहिजे. यात तुमचा थोडासा वेळ जाईल, पण या सगळयाचा फायदा तुम्हाला आत्ता तर होईलच, पण पुढे जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा महत्त्वाचे निर्णय घेणं, अडचणींवर मात करणं, जबाबदारीनं आपलं काम करणं या सगळयासाठी तुमचा मेंदू तयार असेल.’’

‘‘ओके. तर ठरलं आता, या वर्षीपासून मी शारीरिक व्यायाम तर करेनच, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या मेंदूलाही व्यायाम करायला लावेन, जेणेकरून त्याला पुढे जाऊन प्रत्येक वेळेला औषध-गोळयांप्रमाणे इतर साधनांवर अवलंबून राहावं लागणार नाही.’’

bakresnehal@gmail.com