‘वर्ड सर्च’ या खेळात आजच्या कोडय़ाचा विषय आहे- घोडा. सहलीला गेल्यावर घोडय़ावर रपेट करण्याचा आनंद तुम्ही कधीतरी घेतला असेलच. पुराणकाळापासून घोडा या आपल्या मित्राने वाहतुकीसाठी आणि lok14युद्धामध्ये फार मोलाची कामगिरी बजावलेली आहे. झाशीची राणी, शिवाजीमहाराज आणि महाराणा प्रताप यांचे पुतळे नेहमी अश्वारूढ असतात हे तुम्ही पाहिलेच आहे.
सोबतच्या चौरसात घोडय़ाशी संबंधित काही शब्द लपले आहेत. ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. चला तर होऊ  या घोडय़ावर स्वार!  

१) घोडागाडी २) घोडय़ाचे पिल्लू ३) वयाने लहान घोडा ४) घोडय़ाच्या निवासाची जागा ५) घोडय़ाचे ओरडणे ६) घोडय़ाचा तळपाय ७) घोडय़ावर बसण्यासाठी घालावयाचे (कापडी, चामडी) जीन ८) घोडय़ाला ताब्यात ठेवण्याकरिता व वळविण्याकरिता जबडय़ात अडकवली जाणारी दोरी, पट्टा ९) घोडय़ाला खाजविण्याचे, त्याचे अंग साफ करण्याचे एक साधन १०) हरभरे भरलेली घोडय़ाच्या तोंडाला लावावयाची कातडय़ाची पिशवी ११) घोडय़ाच्या पळण्याला अडथळा म्हणून त्याचे मागचे पाय बांधण्याची दोरी १२) घोडय़ांची निगा राखणारा १३) घोडय़ाला मारण्यासाठी वादी लावून केलेला कोरडा, आसूड १४) घोडय़ावर बसून चेंडूने खेळला जाणारा एक खेळ १५) हे पूर्वापार वापरात असलेले शक्ती मोजण्याचे एकक.                    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर :lr24lr25lr26