रवींद्र केळगावकर

मानवी शरीर अंतर्बाह्य स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक क्रियांपैकी हात धुणे ही सर्वात महत्वाची पण सर्वात दुर्लक्षित अशी क्रिया आहे. बहुतांश शिकल्या सावरल्या लोकांना देखील याबद्दलचे शास्त्रशुद्ध ज्ञान नसते. आपले हात हे अनेक जंतू व विषाणू आपल्या पोटापर्यंत पोहोचण्याचे सर्वात सोपे आणि प्रभावी माध्यम आहे. या जंतूंमुळे कॉलरा, सर्दीताप, पोटातील जंत यांसारख्या अनेक रोगांचा प्रसार होतो. डायरिया किंवा अतिसार या जीवघेण्या रोगाचे विषाणू अस्वच्छ हातामार्फतच पोटात जातात. युनिसेफ आणि डब्लू.एच.ओ. सारख्या जागतिक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे की जगातील एकूण बाल मृत्यूंपैकी जवळ जवळ ४०% मृत्यू अतिसारामुळे होतात. शहरातील झोपडपट्ट्या व ग्रामीण भाग यामध्ये अग्रेसर आहेत.

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री

सध्या सुरु असलेल्या करोना नामक महामारीला मात्र अशा कुठल्याही सामाजिक स्तरांचा किंवा भौगोलिक सीमांचा विधिनिषेध नाही. गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण कोरोनाच्या हिट लिस्ट वर आहेत. आश्चर्याची बाब अशी की नियमित आणि वारंवार साबणाने हात धुणे हे करोनाशी लढण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र सिद्ध झाले आहे.

औरंगाबाद मधून कार्यरत असलेली सॅक्रेड ही स्वयंसेवी संस्था २०१४ पासून शालेय विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसंबंधी कार्यक्रम राबवते आहे. या अंतर्गत शाळेतील मुले, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक वर्ग यांना या विषयाचे महत्व समजावून सांगणे, किशोरवयीन मुलींना आणि स्त्री शिक्षिकांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे, सामूहिक हात धुण्याची व्यवस्था ( ग्रुप हँड वॉशिंग स्टेशन ) उभी करून देणे व वैयक्तिक स्वच्छतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वर्तणूक बदल घडवून आणणे या कृती कार्यक्रमांचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये युनिसेफ, ब्लू स्टार, लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यासारख्या देणगीदार संस्थांच्या मदतीने सॅक्रेडने २५०० वर शाळांमधील अडीच लाखांच्यावर मुलांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला आहे.

या सहा वर्षांच्या प्रवासात ‘हँड वॉशिंग’ स्टेशन च्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला आहे. याची सुरुवात वीट बांधकामाच्या मॉडेलपासून झाली. काही काळानंतर कडप्पा वापरून केलेले स्टेशन अस्तित्वात आले. पण बांधकाम साहित्य अनेक ठिकाणी वाहून नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटाटोपामुळे हे दोन्ही प्रकार जास्त काळ चालले नाहीत. लवकरच याची जागा लोखंडाच्या पत्र्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक मॉडेलने घेतली. ह्यामध्ये पाण्याच्या ट्रे ला पावडर कोटिंग केले जात असे ज्यामुळे सतत पाण्याच्या संपर्कात येऊनही तो ट्रे बराच काळ व्यवस्थित टिकत असे. ह्या स्टेशन मध्ये मुलांच्या संख्येनुसार नळ बसवले जात. वाहतूक करणे, बसवणे व जरूर पडल्यास शाळेच्या आवारात इकडे तिकडे हलवणे या दृष्टीने हे मॉडेल अत्यंत सोयीस्कर होते. मराठवाडा आणि विदर्भ यासारख्या कमी पावसाच्या भागांमध्ये या पद्धतीच्या स्टेशन्सनी आपली उपयुक्तता सिद्ध केली.

२०१७ मध्ये सॅक्रेडने पालघर जिल्ह्यात काम सुरु केले. तेथील प्रचंड प्रमाणात पडत असलेला मुसळधार पाऊस ( वार्षिक सरासरी २२०० मी.मी. ) बघताच पत्र्याचे मॉडेल येथे चालणार नाही हे लक्षात आले. अश्या पावसाळी आणि दमट वातावरणात तग धरू शकणाऱ्या मटेरीअलचा शोध चालू झाला. त्यातूनच पॉली प्रॉपीलीन (पी.पी.) आणि लोखंड यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या हायब्रिड मॉडेलचा जन्म झाला.
आठ महिन्यांपूर्वी करोना नावाच्या जागतिक महामारीने आपल्या विश्वात प्रवेश केला आणि सगळ्या जागास वेठीस धरले. नियमित आणि वारंवार साबणाने हात धुण्याने करोनाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो हे कळल्याने हात धुण्याच्या क्रियेला कधी नव्हते एवढे महत्व प्राप्त झाले आहे. परंतु कोरोनाचे विषाणू हाताद्वारे पसरत असल्यामुळे हँड वॉशिंग स्टेशनच्या यापूर्वीच्या कुठल्याही मॉडेल चा वापर करणे शक्य नव्हते, कारण त्यात नळ हाताने चालू बंद करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी असे मॉडेल तयार करण्यात आले ज्यात द्रव साबण आणि पाण्याचा प्रवाह पायाने दाबायचे पेडल वापरून नियंत्रित करता येतो. याच मॉडेल मध्ये जुजबी फेरफार करून फक्त सॅनिटाइझरद्वारे हात स्वच्छ करण्याची यंत्रणा तयार करता येते. सध्याच्या काळात हे मॉडेल विविध सार्वजनिक ठिकाणी ( जसे की सार्वजनिक शौचालये, तुरुंग, सरकारी कार्यालये ) अत्यंत उत्तम प्रकारे सेवा देत आहे.

हँड वॉशिंग स्टेशन चा हा प्रवास यापुढेही असाच चालू राहणार आहे. आणि यापुढेही SIMPLE (सुलभ), SUSTAINABLE (दीर्घकाळ टिकणारे) आणि SCALABLE (सहज मोठ्या प्रमाणावर तयार करता येण्याजोगे) ही त्रिसूत्री हाच त्यांच्या डीझाईन चा गाभा असणार आहे.

(लेखक रवींद्र केळगावकर हे सॅक्रेड या संस्थेचे सचिव आहेत)