पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ३१ धावांनी निसटता पराभव झाला. साहेबांनी भारतापेक्षा सरस खेळ करत मालिकेत ०-१ ने आघाडी घेतली. सांघिक खेळाच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळवला आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने विजयात महत्वाचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली मात्र, विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही. मोजक्याच १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघ १६२ धावांत संपुष्टात आला. यामध्ये विराट कोहलीचे अर्धशथक वगळता इतर फलंदाजांनी निराश केले. हार्दिक पांड्याने ३१ धावांची छोटी खेळी केली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजांची अवस्था पाहून कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराची उणीव भासली.

विराट कोहलीने संघ निवड करताना पुजारा ऐवजी के. एल राहुलला संधी दिली. पण राहुलला कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवता आला नाही. विराट कोहलीने इथेच चूक केली. पुजाराला बाहेर बसवण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशीपासूनच यावरुन विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना टिकेला सामोरं जावे लागेले आहे.

भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहचवण्यात विराट कोहलीसह दुसरा फलंदाज म्हणजे चेतेश्वर पुजारा होय. पुजाराने कसोटीमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत भारताने ८१ कसोटी सामने खळले आहेत. यापैकी भारताने ३९ कसोटीमध्ये विजय आणि २२ कसोटीत पराभवाला सामोर जावे लागलेय. तर २० कसोटी अनिर्णीत राखल्या आहेत. यात आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, या ८१ कसोटीतील ५८ सामन्यात पुजाराने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी भारताने ३३मध्ये विजय तर १२ मध्ये पराभव पाहिला आहे. १३ अनिर्णित राहिल्यात. म्हणजेच पुजारा भारतीय संघात असताना भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ५७ होती. दुसरी म्हत्वाची गोष्ट म्हणजे ज्या २३ सामन्यात भारत पुजराशिवाय खेळला आहे. त्यात भारताला फक्त सहा सामन्यात विजय मिळवता आला तर १० मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुजाराच्या बाजूने हे सर्व आकडे असतानाही विराट कोहलीने राहुलला संधी दिली. विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही गोष्ट चुकचीच.

पुजाराला दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये आपल्या लौकीकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवणे कितपत योग्या आहे. पुजाराला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पुजारा अंतिम ११ मध्ये असता तर कदाचीत परिस्थिती वेगळी दिसली आसती. खेळपट्टीवर पाय रोवून फक्त एका खेळाडूला उभे रहायचे होते. विराट कोहली त्याचे काम बजावत होता. पण समोरू त्याला कोणाकडूच साथ मिळत नव्हती. भारताची कोलमडलेली परिस्थिती पाहून विराट कोहलीला बार बार लगात पुजाराची आठवण नक्कीच आली असेल. यात काही दुमत नाही. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत केलेली चूक पुढील कसोटीत करु नये असे वाटतेय. लॉर्डसवर होणाऱ्या पुढील सामन्यात कोहलीने युवा पंतला कार्तिकच्या जागेवर संधी देऊन विश्वचषकाच्या निवडीची टेस्ट घ्यावी. त्याचप्रमाणे संघात पुजारालाही घ्यायला हवे.

भारताने लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीमध्ये विजय मिळवला होता. ही बाबा विराट कोहलीसाठी सुखावणारी आहे. मात्र, संघ निवड करताना कोहलीनी विचार करायला हवा. पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला बाहेर बसवणे किती महागात पडू शकते याची जाणीव त्याला झालीच असेल. असो…शेवटी एकच, विराट तू तूझी चूक मोठ्या मनाने स्विकारतो आणि त्यावर काम करतो. हे दिग्गज खेळाडूचे लक्षण आहे. लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यात विराटने समतोल संघ निवडावा.