– कश्यप रायबगी, सोहम वैद्य

ठाणे जिल्ह्यातील रोजच्या रोज वाढत जाणाऱ्या कोविड -१९ च्या रुग्णांचा आकडा ३७६०० वर जाऊन पोहचला आहे . ३० जून रोजी मुंबईत ८९३ रुग्णांची वाढ झाली तर ठाणे जिल्ह्यातील ही वाढ १६२८ वर जाऊन पोहचली हि चिंतेची बाब आहे.

मागच्या आठवड्यात एक दिवस सोडला तर दररोज होणाऱ्या कोविड -१९ च्या रुग्णांमधील वाढ एकट्या ठाणे जिल्ह्यात तुलनात्मकरीत्या मुंबईहुन अधिक आहे. २०११ च्या जनगणना आलेखानुसार ठाण्याची लोकसंख्या १.११ कोटी तर, मुंबईची लोकसंख्या हि १.२४ कोटी आहे तरी ठाणे जिल्यातिल रुग्णांची वाढ ३० जूनला मुंबईतील वाढीच्या जवळजवळ दुप्पट होती. २६ मे ते ५ जून ह्या १० दिवसांमध्ये कोविड-१९ चे रुग्ण ४५०० ने वाढले.

४ जूनला लॉकडाऊनची बंधनं शिथिल केल्यानंतर ठाणे आणि मुंबई उपनगरातील आवक-जावक ई-पासशिवाय सुरु करण्यात आली आणि ५ जूननंतर पहिल्या दहा दिवसातच कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये जवळ-जवळ ७००० ने वाढ झाली. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल ट्रेनसेवा सुरु केल्यानंतर म्हणजे १५ जूननंतर २५ जूनपर्यंत हा आकडा १०,००० रुग्णांनी वाढला.

दिवसांगणित होणारी कोविड -१९ च्या रुग्णांमधील वाढ मागच्या महिन्यातील दोन दिवस वगळता मुंबईपेक्षा जास्त आहे. २०, २७ आणि ३० जूनला रुग्णसंख्या ११०० ने वाढली, तर २१ आणि २५ जूनला ही वाढ अनुक्रमे ८०० आणि ९०० रुग्ण इतकी होती. २९ जूनला ही वाढ अचानक १४०० ने झाली. हा ठाणे जिल्ह्यातील या महिन्यातील रुग्ण नोंदणीचा उच्चांक आहे.

कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ३० जूनला ४०% इतका होता, जो १० जून पासून ३८% ते ४३% या दरम्यानच आहे. जमेची बाजू ऐवढीच आहे की २७ मेपर्यंत ३% रुग्णांचा मृत्यू होत होता, तो जून २९ पर्येंत ३% राखणे शक्य झाले आहे.

(कश्यप रायबागी हा डेटा जर्नलिस्ट आहे तर सोहम् वैद्य हा ह्मुमँनेटेरीयन एड वर्कर आहे )