scorecardresearch

अदाणी देशातील आणखी विमानतळांसाठी बोली लावणार; कंपनीचे सीईओ म्हणाले, ”पुढील काही वर्षांत”

पुढील काही वर्षांत डझनहून अधिक विमानतळांचे खासगीकरण करणे अपेक्षित आहे आणि आम्ही त्यांच्या बोलीमध्ये सहभागी होऊ, असंही अदाणी एअरपोर्ट्सचे सीईओ अरुण बन्सल म्हणालेत.

adani airport
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

अदाणी ग्रुपची कंपनी असलेली अदाणी एअरपोर्ट्स येत्या काही दिवसांत आणखी विमानतळांसाठी बोली लावणार आहे. कंपनीचे सीईओ अरुण बन्सल यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. कंपनीला आपल्या विमानतळांची संख्या वाढवायची आहे. पुढील काही वर्षांत डझनहून अधिक विमानतळांचे खासगीकरण करणे अपेक्षित आहे आणि आम्ही त्यांच्या बोलीमध्ये सहभागी होऊ, असंही अदाणी एअरपोर्ट्सचे सीईओ अरुण बन्सल म्हणालेत.

कंपनी एव्हिएशन इन्स्टिट्यूटच्या स्थापनेवर काम करतेय

सेंटर फॉर एव्हिएशन समिटमध्ये बन्सल म्हणाले की, अदाणी एअरपोर्ट्स एव्हिएशन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यावर काम करीत आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत नवी मुंबई विमानतळ डिसेंबर 2024 पर्यंत सुरू होईल, असेही ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल.

अदाणी एअरपोर्ट्स ही देशातील सर्वात मोठी ऑपरेटर कंपनी

अदाणी एअरपोर्ट्स ही देशातील सर्वात मोठी विमानतळ ऑपरेटर कंपनी आहे. सध्या त्यांच्याकडे देशातील 7 विमानतळांची कमान आहे. मुंबई विमानतळाव्यतिरिक्त अदाणींकडे इतर 6 प्रमुख विमानतळ आहेत, ज्यात अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळांचा समावेश आहे. त्यांचे व्यवस्थापन केवळ अदाणी समूहाकडे आहे. 2019 मध्ये बोली जिंकल्यानंतर पुढील 50 वर्षांसाठी या विमानतळांचे संचालन करण्याची जबाबदारी समूहाकडे आली आहे.

गेल्या वर्षी ग्राहक अॅप लाँच करण्यात आले

हवाई प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी अदाणी समूहाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘अदाणी वन’ हे ग्राहक अॅप लॉन्च केले. या अॅपद्वारे फ्लाइट बुकिंग, फ्लाइट स्टेटस, कॅब बुकिंग आणि एअरपोर्ट लाउंज बुकिंग अशा अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. हे अॅप आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या