Ashish Deora Success Story : भारतात अनेक स्टार्टअप्स नव्यानं तयार झाली आहेत. यापैकी फक्त काहीच यशस्वी झाले आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या नामवंत उद्योगपतींचा पाठिंबा मिळूनही अनेक स्टार्टअप्सच्या पदरी निराशा पडलेली आहे. पण काही उद्योजक असेसुद्धा आहेत जे मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशीच एक बंगलोर स्थित कंपनी आहे NestAway Technologies Pvt आहे. रतन टाटा यांचे समर्थन असलेले हे ऑनलाइन घर भाड्याने देणारे स्टार्टअप आहे. आशिष देवरा हे सध्या ते स्टार्टअप चालवतात. आशिष देवरा यांनी १९९६ मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ऑरम व्हेंचर्सची स्थापना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष देवरा सध्या ऑरम व्हेंचर्सचे सीईओ आहेत. त्यांना खाणकाम ते दूरसंचार क्षेत्रामध्ये अनेक दशकांचा अनुभव आहे. सूचीबद्ध फर्म Aurum Proptech Ltd ने Nestways चे अधिग्रहण केले आहे. ज्याची किंमत २०१९ मध्ये सुमारे १८०० कोटी होती. देवरा यांनी ते केवळ ९० कोटींना विकत घेतले आहे.

हेही वाचाः २०२३-२०३० दरम्यान भारताची अर्थव्यवस्था २०१० नंतरच्या सर्वात मजबूत वाढीच्या टप्प्यावर : नोमुरा सिक्युरिटीज

देवरा यांनी पहिली ऑप्टिकल फायबर कंपनी स्थापन केली

देवरा यांनी दूरसंचार, विमान वाहतूक, खाणकाम, रिअल इस्टेट आणि प्रॉपटेक यासह अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय उभारले आहेत. १९९९ मध्ये आशिष यांनी IOL Telecom ची स्थापना केली. मुंबईत ऑप्टिकल फायबर विकसित आणि विकणारी पहिली कंपनी होती.

हेही वाचाः BYJU’S Aakash IPO : बायजू-आकाशचा आयपीओ पुढच्या वर्षी येणार; नव्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार

हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले

आशिष देवरा यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी २०१०-११ पर्यंत हार्वर्डमध्ये विलीनीकरण आणि अधिग्रहण, कॉर्पोरेट पुनर्रचनाचा अभ्यास केला. येथून त्यांनी ओपीएम म्हणजेच ओनर प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम देखील पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉम केले आहे. त्यांचे शालेय शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून झाले.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deora success story former student of harvard bought a company related to ratan tata for just 90 crores who is ashish deora vrd
First published on: 06-06-2023 at 11:30 IST