आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूकप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात याशिवाय आणखी सहा जणांची नावे आहेत.

वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचे म्हणणे आहे. त्या बदल्यात चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत व्हिडीओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले होते.

धूत यांचे नातेवाईक, चार्टर्ड अकाऊंटचे नावही समाविष्ट

कोचर आणि धूत यांच्याशिवाय सीबीआयच्या आरोपपत्रात चार्टर्ड अकाउंटंट आणि धूत यांच्या नातेवाईकाचीही नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात सादर केले आहे. तरीही छाननी सुरूच आहे. छाननीनंतर आरोपपत्राची प्रत आरोपींना दिली जाईल. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर केले जाईल.

हेही वाचाः Mukesh Ambani New Business : मुकेश अंबानी आता २० हजार कोटींच्या ‘या’ व्यवसायात उतरणार, प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणणार

कोचर यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरीची प्रतीक्षा

सीबीआयशी संबंधित एका सूत्राचे म्हणणे आहे की, चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेची परवानगी मिळणे बाकी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अशी मान्यता घेणेही बंधनकारक आहे. त्याचवेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाची दखल घेतल्यानंतरच कोचर आणि अन्य आरोपींविरुद्ध खटला सुरू होईल. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कोचर दाम्पत्याला डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती

कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआयने कोचर दाम्पत्याला गेल्या वर्षी २३ डिसेंबर २०२२ रोजी अटक केली होती. तर धूत त्यांच्यानंतर तीन दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणी पहिली एफआयआर २०१९ मध्ये नोंदवण्यात आली होती. हे प्रकरण व्हिडीओकॉन समूहाला १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे कथित चुकीच्या वाटपाशी संबंधित आहे. अटकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोचर यांची ९ जानेवारीला, तर धूत यांची २० जानेवारीला जामिनावर सुटका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः सिम कार्डसाठी केवायसी पडताळणी लवकरच होणार डिजिटल