EPFO pension rules: कर्मचारी भविष्य निधी संघटने (EPFO)चे देशभरात जवळपास ७ करोड सदस्य आहेत. यापैकी अनेक सदस्य असे आहेत ज्यांना हे माहीत नसते की, त्यांच्या सॅलरीमधून जे पैसे कापले जातात त्यानुसार त्यांची रिटायरमेंट पेन्शन किती असेल. तसंच त्याचं गणित नेमकं कसं असतं. जर तुम्हीसुद्धा अशाच सदस्यांपैकी एक आहात तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
पीएफ पेन्शन कशी ठरवली जाते?
ईपीएफओची ईपीएस स्कीममध्ये तुम्ही काम करत असलेल्या कंपनीच्या १२ टक्के भागीदारीतून ८.३३ टक्के भाग ट्रान्सफर केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की ही रक्कम तुमच्या पूर्ण पगारानुसार ठरवली जात नाही. २०१४पासून ईपीएस कॉन्ट्रीब्युशनची एक मर्यादा ठरवली गेली आहे. याअंतर्गत तुमच्या पेन्शन खात्यात दर महिन्याला १,२५० रूपयेच जमा होऊ शकतात. कंपनीची भागीदारी जर या रकमेपेक्षा जास्त अशेल, तर ती रक्कम तुमच्या ईपीएफ अकाउंटमध्ये जाते.
किती पेन्शन मिळू शकते?
तुम्हाला ईपीएस स्कीमअंतर्गत किती पेन्शन मिळणार हे तुमच्या कामाची वर्षे आणि वर्षाला तुमचा पगार यावर अवलंबून असते. सध्या असलेल्या नियमांनुसार, ईपीएसअंतर्गत नवीन पेन्शन दर महिन्याला एक हजार आणि जास्तीत जास्त ७५ हजार पर्यंत मिळू शकते.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?
प्रत्येक ईपीएफ सदस्याला ईपीएसचा लाभ मिळत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जर ईपीएफमध्ये सप्टेंबर २०१४ नंतर खाते उघडले असेल, तसंच जर तुमचा बेसिक पगार दर महिन्याला १५ हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ईपीएसचा फायदा मिळणार नाही.
अशावेळी कंपनीचा पूर्ण हिस्सा तुमच्या ईपीएफ अकाउंटवर जातो. म्हणजेच या योजनेचा फायदा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.