scorecardresearch

Premium

क्यूआर कोडशिवाय प्रकल्पांच्या जाहिरातींची १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास; ७४ विकासकांना कारणे दाखवा नोटीस

महारेराने १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड छापणे बंधनकारक केलेले आहे. महारेरा वर्तमानपत्रांतील जाहिरातींशिवाय ऑनलाइन, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरील जाहिरातींवरही लक्ष ठेवून आहे.

maharera
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड न छापणाऱ्या राज्यातील ७४ विकासकांना महारेराने कारणे दाखवा नोटिसेस बजावल्या असून, अशी एकूण १०७ प्रकरणे महारेराच्या निदर्शनास आलेली आहेत. यातील २५ प्रकरणी सुनावणी झाली असून, ६ प्रकरणांत एकूण २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणी सुनावणी आणि दंड निर्धारणाची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय यातील उर्वरित ३३ विकासकांनाही कारणे दाखवा नोटिसेस पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महारेराने १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड छापणे बंधनकारक केलेले आहे. महारेरा वर्तमानपत्रांतील जाहिरातींशिवाय ऑनलाइन, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरील जाहिरातींवरही लक्ष ठेवून आहे. ऑनलाइन आणि फेसबुकवरील जाहिरातींमध्ये क्यूआर कोड न वापरण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे.

ratangiri devlopment
रत्नागिरीच्या विकासासाठी शासकीय धोरणांसह सामूहिक प्रयत्नांची गरज; ‘व्हिजन रत्नागिरी २०५०’ परिसंवादातील मत
advertising the project
महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय प्रकल्पाची जाहिरात करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
government scheme chatura marathi article, government scheme for womans marathi news
शासकीय योजना : स्त्री-उद्योजिकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान
maharera draft announced compulsory provision of special facilities to senior in housing projects
ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पात विशेष सुविधा देणे बंधनकारकच आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा महारेराचा मसुदा जाहीर

हेही वाचाः १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के GST लावला जाणार : CBIC चेअरमन

याशिवाय ऑनलाइन आणि फेसबुकवरील जाहिरातींच्या अनुषंगाने दिलेल्या नोटिसेसला उत्तर देताना अशा जाहिराती त्यांनी दिल्या नाही, अशी भूमिका काही विकासकांनी घेतलेली आहे. त्यांच्या परवानगीशिवाय अशा जाहिराती करणाऱ्यांविरुद्ध सायबर क्राईम यंत्रणेकडे गुन्हे नोंदविण्याचे निर्देश या विकासकांना देण्यात आलेले आहेत.

हेही वाचाः RBI Imposes Penalty : RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर ‘या’ ३ बँकांना दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

प्रत्येक विकासक आपल्या प्रकल्पाच्या एजन्टसची माहिती त्यांच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर देत असतात . समाज माध्यमांवरील या जाहिरातींबाबत दक्षता बाळगून संबंधिताच्या संकेतस्थळावरून त्याबाबतची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा यात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित विकासकांच्या संकेतस्थळावरून याबाबत खात्री करून घ्यावी, असे आवाहनही महारेराने केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 107 cases of advertisement of projects without qr code pointed out by maharera 74 show cause notices to developers vrd

First published on: 29-09-2023 at 12:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×