पीटीआय, नवी दिल्ली

ई-कॉमर्स व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण करणाऱ्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’च्या (ओएनडीसी) मंचावरून मार्च २०२५ पर्यंत दरमहा तीन ते चार कोटी व्यवहार होऊ लागतील, अशी आशा या मंचाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. कोशी यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. ओएनडीसी ही केंद्र सरकारच्य उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत खुला ई कॉमर्स मंच आहे.

ओएनडीसीच्या मंचावरून जूनमध्ये १ कोटी व्यवहार पार पडले. त्याआधीच्या म्हणजेच मे महिन्यात ७० लाख व्यवहार पार पडले होते. विद्यमान आर्थिक वर्षाअखेर मात्र ही संख्या दरमहा ३ ते ४ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. या मंचासोबत ५ ते ६ लाख व्यापारी जोडले गेले आहेत. येत्या काही महिन्यांत या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशातील ई-कॉमर्स परिसंस्था सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने सरकारच्या पुढाकाराने ओएनडीसीची स्थापना करण्यात आली. कोणताही विक्रेता ‘ओएनडीसी’वर नेटवर्क-कनेक्टेड विक्रेत्या ॲप्सद्वारे सहज नोंदणी करू शकतो आणि आपल्या सेवा-उत्पादनांसाठी ऑनलाइन विक्रीचे दालन खुले करू शकतो.

हेही वाचा >>>Stock Market Update: ‘सेन्सेक्स’चे चार शतकी तेजीसह विक्रमी शिखर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग अर्थात एमएसएमईचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये ३० टक्के आणि निर्यातीत ४० टक्के योगदान राहील, असे नमूद करीत ‘न्यू इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील एमएसएमईची महत्त्वाची भूमिका आहे, असे ‘सीआयआय’च्या एमएसएमई परिषदेचे अध्यक्ष समीर गुप्ता म्हणाले.