scorecardresearch

टीसीएसकडून ७० टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ

टीसीएसने एकूण सहा लाख कर्मचाऱ्यांपैकी चार लाख कर्मचाऱ्यांच्या चल वेतनांत (व्हेरिएबल पे) १०० टक्के वाढ जाहीर केली आहे.

टीसीएसकडून ७० टक्के कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

नवी दिल्ली : एकीकडे ट्विटर, गूगल यासारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात सुरू असताना भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के वाढीची घोषणा केली आहे. नववर्षांची गोड भेट देताना कंपनीने ७० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविले आहे.

टीसीएसने एकूण सहा लाख कर्मचाऱ्यांपैकी चार लाख कर्मचाऱ्यांच्या चल वेतनांत (व्हेरिएबल पे) १०० टक्के वाढ जाहीर केली आहे. तर उर्वरित ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित वेतनवाढ मिळेल. सध्या केवळ १० ते २० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन चल वेतनावर आधारित आहे. चल वेतन साधारणत: कंपनीच्या कामगिरीवर परिवर्तित होत असते. सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत प्रथमच टीसीएसने १० हजार कोटींच्या नफ्याचा टप्पा ओलांडून, १०,४३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. चालू वर्षांतील पहिल्या तिमाहीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि टीसीएसच्या प्रतिस्पर्धी कंपन्या असलेल्या विप्रो आणि इन्फोसिसने चल वेतनात कपात केली आहे.

सरलेल्या जुलै-सप्टेंबर २०२२ या तिमाहीत, टीसीएसने ९,८४० नवीन कर्मचारी कंपनीत सामावून घेतले आहेत. ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार टीसीएसने एकूण ६,१६,१७१ कर्मचारी संख्येचा आकडा गाठला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 04:19 IST

संबंधित बातम्या