Adani Ports : अदाणी पोर्टने आणखी एक बंदर खरेदी केलं आहे. गोपाळपूर बंदरातील ९५ टक्के भाग गौतम अदाणी यांनी खरेदी केला आहे. हा करार ३०८० कोटींना झाला आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर १.५ टक्क्यांनी वाढला आणि १२८१ रुपयांवर बंद झाला. शापूरजी पालोनजी समूह आणि अदाणी पोर्ट्स इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे.

हा करार नेमका काय आहे?

अदाणी पोर्टने ९५ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदाणी पोर्ट्सने एसपी पोर्ट मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५६ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. एसपी पोर्ट मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड हा एसपी ग्रुपचा भाग आहे. याशिवाय अदाणी पोर्ट्सने ओरिसा स्टीव्हडोरेस लिमिटेड ३९ हिस्सा खरेदी केला आहे.

गोपाळपूर पोर्ट्स लिमिटेड या बंदरावर अनेक प्रकारचे ड्राय बल्क आणि ब्रेक बल्क कार्गो हाताळले जातात. हे एक मल्टि कार्गो पोर्ट आहे. या पोर्टवर लोखंड, कोळसा, चुनखडी, इल्मेनाइट वाळू आणि अॅल्युमिनियमसह कोरड्या बल्क कार्गोची वाहतूक होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीनफिल्ड एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिन उभारण्यासाठी बंदराने पेट्रोनेट एलएनजीसह करार केला आहे. गोपाळपूर बंदराची विक्री ही एसपी ग्रुपची मागच्या काही महिन्यांमधली बंदरातील दुसरी निर्गुंतवणूक आहे अशीही माहिती एसपी ग्रुपने एका निवेदनात दिली आहे.