देशात नाण्यांचे वितरण सुलभ करण्यासाठी आरबीआयने वेगाने कामाला सुरुवात केली आहे. देशातील १२ शहरांमध्ये QR आधारित कॉईन वेंडिंग मशीन बसवले जाणार आहे, ज्याद्वारे नाणी वितरित केली जातील, अशी घोषणा मार्चमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती.

सध्या देशात नाण्यांचे वितरण बँकेच्या शाखेतील काऊंटरद्वारे केले जाते. याबरोबरच नाण्यांचे वितरण सुलभ करण्यासाठी मध्यवर्ती बँक ग्रामीण, निमशहरी आणि दुर्गम भागात मोबाईल कॉईन व्हॅनच्या वापरावर भर देत आहे. तसेच करन्सी चेस्ट शाखेत कॉईन मेळाही आयोजित करण्यात आला आहे, असंही आरबीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

नाणे वितरणासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार

आरबीआयच्या वार्षिक अहवालात तंत्रज्ञानाच्या मदतीने नाण्यांच्या वितरणात सुधारणा केली जाईल, असे म्हटले होते. यासाठी केंद्रीय बँक पाच बँकांच्या (अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँक) यांच्या सहकार्याने १२ शहरांमध्ये (अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कानपूर, कोलकाता) काम करणार आहे. मुंबई, नवी दिल्ली, पाटणा, प्रयागराज आणि कोझिकोड येथे १९ ठिकाणी कॉईन वेंडिंग मशीनसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे.

QR कोड आधारित कॉईन वेंडिंग मशीन (QCVM) म्हणजे काय?

QR कोड आधारित कॉईन व्हेंडिंग मशीन ही कॅशलेस कॉईन डिस्पेंसिंग सिस्टीम आहे. यामध्ये ग्राहक QR कोड स्कॅन करून UPI ​​द्वारे पैसे देऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारंपरिक नाणे कॉईन वेंडिंग मशीनपेक्षा किती वेगळे?

QR कोड आधारित व्हेंडिंग मशिनमध्ये नोटांची गरज भासणार नाही. ग्राहक फक्त स्कॅन करून इच्छित क्रमांकाची आणि मूल्याची नाणी घेऊ शकतील, यासाठी नोटचे प्रमाणीकरण करण्याची गरज भासणार नाही.