scorecardresearch

Premium

बाजाराला अधिक समावेशक, जोखीमरहित बनवणाऱ्या बदलांशी ‘बीएसई’ची कटिबद्धता

‘लोकसत्ता’ला माहिती देताना समीर पाटील म्हणाले, ‘आमचा दृष्टिकोन दोन प्रमुख पैलूंमध्ये विभागला गेलेला आहे. सुलभता-सहजता तसेच जोखीमविषयक दक्षतेसह सहभागात वाढ हेच घटक येथील प्रत्येक बदलामागील प्रेरणा असतात.’

Chief Business Officer BSE, Sameer Patil
बाजाराला अधिक समावेशक, जोखीमरहित बनवणाऱ्या बदलांशी ‘बीएसई’ची कटिबद्धता

मुंबईः व्यापारी, गुंतवणूकदार, हेजर्ससह सर्व सहभागी घटकांसाठी भांडवली बाजार अधिक समावेशक तसेच कमी जोखमीचा बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याची ग्वाही देतानाच, हे नाविन्यपूर्ण उपक्रम एकंदर भारताच्या बाजारपेठेच्या प्रतिष्ठा आणि वाढीसाठी उपकारक ठरतील तसेच तिच्या जागतिक दर्जाला प्रतिबिंबित करतील, असे प्रतिपादन मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई लिमिटेडचे मुख्य व्यवसाय अधिकारी समीर पाटील यांनी केले.

सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात आशियातील सर्वात जुन्या एक्सचेंजेसपैकी एक असलेल्या ‘बीएसई’ने नव्याने विकसित होत असलेल्या आर्थिक जगताशी ताळमेळ राखण्यासाठी अनेक तांत्रिक बदल आजवर स्वीकारले आहेत. ‘लोकसत्ता’ला माहिती देताना समीर पाटील म्हणाले, ‘आमचा दृष्टिकोन दोन प्रमुख पैलूंमध्ये विभागला गेलेला आहे. सुलभता-सहजता तसेच जोखीमविषयक दक्षतेसह सहभागात वाढ हेच घटक येथील प्रत्येक बदलामागील प्रेरणा असतात.’

documentary making and Changers of Attitudes
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..
human-animal conflict
यूपीएससी सूत्र : केरळमधील मानव-वन्यप्राणी संघर्ष अन् चीनचा महत्त्वकांशी ‘शाओकांग’ प्रकल्प; वाचा सविस्तर…
UPSC Preparation Ethics in Public Administration
UPSC ची तयारी: लोक प्रशासनातील नैतिकता (भाग-१)
Mpsc Mantra Intelligence Test Question Analysis
Mpsc मंत्र : बुद्धिमत्ता चाचणी-प्रश्न विश्लेषण

हेही वाचा… Gold-Silver Price on 28 November 2023: चांदीने ७५ हजारांचा टप्पा केला पार, तर सोन्याच्या भावात मोठी वाढ; पाहा आजचा दर किती

सर्वप्रथम, २०१३ मध्ये बीएसईने सर्वसमावेशक तांत्रिक परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे सहा मायक्रोसेकंदांच्या अतिसूक्ष्म प्रतिसाद वेळेसह जगातील ते सर्वात वेगवान तंत्रज्ञानाधारित एक्सचेंज बनले. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी वचनबद्धतेचा हा दाखलाच आहे, असे पाटील म्हणाले. १५ मे २०२३ रोजी, बीएसईने त्याचे सेन्सेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा सुरु केले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सेन्सेक्स कॉन्ट्रॅक्ट्सने सर्वाधिक १७५ लाख कोटी रुपयांची उलाढाल केली असून, २७ कोटी करार अवघ्या २५ ट्रेडिंग एक्सपायरीमध्ये झाले आहेत.

हेही वाचा… संरक्षण क्षेत्रासाठी स्थानिक नवउद्यमींचे ‘आत्मनिर्भर’ उपाय, दहा उपक्रमांचा एकत्रित २,००० कोटींच्या उलाढालीचा टप्पा

उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे सहभागाची पातळी वाढवण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण बदल केले गेले. प्रथम, सेन्सेक्स आणि बँकेक्स कॉन्ट्रॅक्ट्ससाठी कराराचा आकार १५ वरून १० वर आणत कमी केला. तसेच ते अधिक सुलभ, सोपे बनवले आणि सेन्सेक्सची एक्सपायरी (सौदा पूर्ती) शुक्रवार आणि बँकेक्सची एक्सपायरी सोमवारी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संपूर्ण भारतातील सुमारे ३०० ब्रोकर्स बरोबर सल्लामसलत केलेल्या कार्यगटाच्या अभिप्रायाच्या आधारे कराराची पूर्तता मुदत शुक्रवारची केली. या बदलामुळे ब्रोकर्सना नवीन महसूल प्रवाह शोधण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्या मंगळवार ते गुरुवार दरम्यानच्या इतर निर्देशांकांवरील व्यापारात कोणताही अडथळा आलेला नाही, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा… मारुती सुझुकीच्या मोटारी महागणार, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने जानेवारीपासून किंमतवाढ

बीएसईला ‘संपत्ती निर्मितीचे मंदिर’ म्हणून संबोधले जाते आणि त्यात अधिकाधिक लोकांना येता यावे यासाठी सतत सुधारणा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. – समीर पाटील

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Commitment by bse about changes that make the market more de risked inclusive print eco news asj

First published on: 28-11-2023 at 10:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×