फ्रान्सची ‘दसॉल्ट एव्हिएशन’ त्यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबतच्या संयुक्त उपक्रमातील आपला हिस्सा ४९ टक्क्यांवरून ५१ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेड (आरएएल) ही संयुक्त उपक्रम असलेल्या दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेडमधील (डीआरएएल) हिस्सेदारीपैकी २ टक्के हिस्सा दसॉल्ट एव्हिएशनला हस्तांतरित करणार आहे.

सध्या, आरएएलचा संयुक्त उपक्रम असलेल्या दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसमध्ये ५१ टक्के हिस्सा आहे, तर दसॉल्ट एव्हिएशनकडे ४९ टक्के हिस्सा आहे. यानंतर, दसॉल्टकडे ५१ टक्के हिस्सा असेल आणि डीआरएएल ही दसॉल्ट एव्हिएशन उपकंपनी बनेल. हा करार १ नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे.

दसॉल्ट एव्हिएशन लष्करी आणि व्यावसायिक जेटची निर्मिती करते शिवाय राफेल आणि फाल्कन विमानांचे इंटिग्रेटर आहे, तसेच या विमानांच्या एअरफ्रेम आणि सबसिस्टम्सची उत्पादक कंपनी आहे. त्यांचे बाजार भांडवल २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे आणि त्यांच्याकडे ८०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख राखीव आहे. फाल्कन विमानांसाठी दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि.ला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयानंतर दसॉल्ट एव्हिएशनच्या हिस्सेदारीत वाढ झाली आहे.

दसॉल्ट आणि रिलायन्स एरोस्ट्रक्चरने भारतात फाल्कन जेट तयार करण्यास सहमती दर्शविली होती, ज्याची निर्मिती राज्यातील नागपूर येथे होणार आहे. फ्रान्सबाहेर फाल्कन राज्यात नागपूर येथे निर्मिती केली होणार आहे. भारतीय भूमीवरून ‘मेड इन इंडिया’ फाल्कन २००० चे पहिले उड्डाण २०२८ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे.