पुणे : फोर्स मोटर्सने बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाच्या भागीदारीतून चेन्नईतील उत्पादन प्रकल्पात एक लाखाव्या इंजिनच्या निर्मितीचा मैलाचा टप्पा गाठला. हे इंजिन ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’ या मोटारीत वापरले जाते.फोर्स मोटर्स आणि बीएमडब्ल्यू यांच्यात दशकभरापासून ही भागीदारी आहे.

चेन्नईतील प्रकल्पात भारतात निर्माण होणाऱ्या बीएमडब्ल्यू मोटारींसाठी इंजिनची निर्मिती होते. बीएमडब्ल्यू कंपनीला भारतात मोटारी निर्माण करताना स्थानिक कंपन्यांच्या सुट्या भागांचा वापर गरजेचा आहे. यामुळे जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय निर्मिती कौशल्ये यांची ही भागीदारी सुरू झाली. चेन्नईतील प्रकल्पात २०१५ पासून या भागीदारीच्या माध्यमातून इंजिनची निर्मिती सुरू झाली. हा प्रकल्प आता बीएमडब्ल्यूच्या भारतातील निर्मिती प्रक्रियेतील अविभाज्य भाग बनला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईतील प्रकल्पातून एक लाखाव्या इंजिनची निर्मिती झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास बीएमडब्ल्यू-प्रॉडक्शन नेटवर्क २, बीएमडब्ल्यू एजी कंपनीचे उपाध्यक्ष मार्कस वॉलन्स, बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांट चेन्नईचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस डोस, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया आदी उपस्थित होते.यावेळी प्रसन्न फिरोदिया म्हणाले की, फोर्स मोटर्सच्या अत्याधुनिक निर्मिती प्रकल्पाची दशकपूर्ती झाली आहे. या प्रकल्पातून एक लाखाव्या इंजिनची निर्मिती करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बीएमडब्ल्यूसोबत देशात भागीदारी करून त्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने देण्यात आम्ही मैलाचा टप्पा गाठला आहे.