HDFC बँकेने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने ३५ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.२० टक्के आणि ५५ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.२५ टक्के व्याज देत दोन विशेष मुदत ठेव योजना सुरू केल्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व योजनांवर ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळणार आहे. बँक १८ महिने ते १० वर्षांपर्यंतच्या ठेवींवर ७ टक्के सूट देत आहे.

बुकिंग करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

बँकांमधील ठेवींचे दर वाढत आहेत आणि बहुतेक बँका निवडक कालावधीसाठी किरकोळ देशांतर्गत ठेवींवर ७ टक्के किंवा त्याहून अधिक ऑफर देत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी उच्च व्याजदरावर गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य आणल्यास जोखीम कमी होते. अनेक मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर आणि G-Sec बाँडचे उत्पन्न हे व्याजदर त्यांच्या शिखरावर असल्याचे सांगते. “जास्त व्याजदर देणार्‍या FD मुदतीचे बुकिंग सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असंही पैसाबाजारचे वरिष्ठ संचालक गौरव अग्रवाल यांनी सांगितलं.

हेही वाचाः स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी नोंदणी करायचीय; ‘या’ पाच सोप्या टप्प्यांचं पालन करा

इतर बँकांच्या दरांशी तुलना करा

विशेष ठेवींमध्ये गुंतवणूक करताना व्यक्तींनी त्यांच्या गुंतवणुकीची क्षितिजे लक्षात ठेवली पाहिजेत, कारण मुदत ठेवी वेळेआधी काढल्यास नुकसान होते. HDFC बँकेने ऑफर केलेल्या मुदत ठेवींचा कालावधी ३५ महिने आणि ५५ महिने आहे. गुंतवणूकदारांनी इतर शेड्युल्ड बँकांद्वारे ऑफर केलेल्या मुदत ठेव दरांची तुलना करावी, कारण अनेक लघु वित्त बँक ८ टक्के आणि त्याहून अधिक एफडी दर देत आहेत, असंही BankBazaar चे CEO आदिल शेट्टी सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः भारतातून मोबाईल फोन निर्यात वाढल्याचा फक्त आभास? RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडली आकडेवारी!